पूणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दोन गटात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मावळमधील आंदर मावळ विभागातील कुसुर गाव हद्दीत हा प्रकार घडला. या गंभीर घटनेत एका व्यक्तीचा धारदार शस्त्राचे वार झाल्याने हत्या घडल्याची माहिती समोर येत आहे
घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळावर भेट दिली. कुसूर हद्दीत कामा रिसॉर्ट समोर ही घटना घडली. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह तळेगाव येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. ( Two groups clashed and one was killed due to a land dispute in Maval taluka Pune Crime )
कुसूर गावाच्या हद्दीत टाकवे ते खांडी रस्त्यावर बुधवारी (दि. 5 जून) रात्री उशीरा ही घटना घडली. सुरुवातीला किरकोळ बाचाबाची आणि नंतर त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यात एका 26 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर काहीजण गंभीर जखमी आहे. पोलिसांनी आरोपींची नावे निश्तित केली असून अद्याप एकालाही अटक नाहीये. आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून वडगाव पोलिस पुढील तपास करत आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.