जागतिक ध्यानधारणा दिनानिमित्त आपुलकी बेघर निवारा केंद्रात विपश्यना शिबीराविषयी मार्गदर्शन…
जागतिक ध्यानधारणा दिनानिमित्त आपुलकी बेघर निवारा केंद्रात विपश्यना शिबीराविषयी मार्गदर्शन…
महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील, दिनदयाळ अंत्त्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत, सोलापूर महापालिका, सोलापूर संचलित, आपुलकी बेघर निवारा केंद्र, कुमठा नाका, सोलापूर येथील बेघर अनाथ महिला व पुरुष लाभार्थ्यांना, आजच्या जागतिक ध्यानधारणा दिनाचे औचित्य साधून, विपश्यना ध्यान साधनेच्या शिबीराविषयी माहिती देण्यात आली.
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा, विपश्यना साधक, शाहीर रमेश खाड़े यांनी, याविषयी सविस्तर माहिती देऊन, आनापान सती ध्यानाचे प्रात्यक्षिक करून घेतले.
यावेळी जय भारत माते नागरी व ग्रामीण सेवाभिवृद्धी संस्थेकडील व्यवस्थापक अशोक वाघमारे यांनी, येथील समाजसेवक राहूल भडकुंभे यांचे उपस्थितीत प्रास्ताविक करुन, उपस्थितांना याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सोलापूर शहरातील रस्त्याचे कडेला, फुटपाथवर तसेच, मंदीर, मस्जिद, रेल्वे स्टेशन, बस स्थानके, जिल्हा परिषद, रंगभवन, सात रस्ता, आदी परिसरातील, बेघर व अनाथ महिला व पुरुष यांचेसाठी असलेल्या या बेघर निवारा केंद्रातील सुमारे २२ लाभार्थ्यांनी उपस्थिती दाखवून व याविषयीची माहिती घेऊन, समाधान व्यक्त केले. तसेच, दररोज सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना, असे आनापान सती ध्यान करण्याचे आणि लवकरच १० दिवसांचे विपश्यना शिबिर करण्याचे अभिवचन दिले.