आषाढी वारीमध्ये संविधान दिंडी द्वारे लोकजागर
आषाढी वारीमध्ये संविधान दिंडीद्वारे लोकजागर !
———————————————-
वेळापूर व भंडीशेगाव येथे उत्स्फूर्त स्वागत !
————————————————
संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन !
————————————————-
पंढरपूर : आषाढी वारीच्या निमित्ताने राज्यातील विविध भागातून मानाच्या पालखी व विविध दिंड्या पंढरपूरकडे येत असतात. यामध्येच संविधान दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संस्थेच्या वतीने संविधान दिंडीच्या माध्यमातून संविधानाचा लोक जागर करण्यात आला. माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील वारीच्या मार्गावरील विविध गावांमध्ये या दिंडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
वेळापुर (ता.माळशिरस जिल्हा सोलापूर ) येथील पालखी चौक येथे संविधान दिंडीचे स्वागत माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती उत्तमराव जानकर , उपसरपंच जावेद मुलानी, रिपब्लिकन पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे व ग्रामस्थांनी संविधान रथाचे स्वागत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून केले.
बार्टी संस्थेच्या वतीने समतादुत विभागातिल प्रकल्प अधिकारी सचिन नांदेडकर व सोलापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे यांच्या हस्ते मान्यवरांना संविधानाची प्रत, उद्देशिका देऊन सन्मानित करण्यात आले.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी सोलापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे , सचिन नांदेडकर , बार्टी व समाज कल्याण विभागातिल अधिकारी व कर्मचारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व वारकरी बांधव उपस्थित होते.
लोकशाहीर जितेंद्र धाईजे व कला मंच यांनी संविधानासंदर्भात प्रबोधन केले. सुत्रसंचालन रामदास लोखंडे यांनी केले.सविधान दिंडीचे भंडीशेगाव येथे स्वागत !निर्मलग्राम ग्रामपंचायत भंडीशेगाव (तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर) येथे संविधान दिंडीचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने स्वागत करून बार्टी संस्थेचे आभार मानले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे , आयोजित संविधान दिंडीचे स्वागत निर्मल ग्राम ग्रामपंचायत भंडीशेगाव तालुका पंढरपूर येथे सरपंच प्रतिनिधी प्रकाश यलमार, माजी जिल्हा परिषद सदस्य दौलतराव ननवरे, माजी उपसरपंच संतोष ननवरे यांनी स्वागत केले. सविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन जालना जिल्हा प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांनी केले.
- सोलापूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र भुजाडे , बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन नांदेडकर यांच्या हस्ते प्रकाश यलमार, माजी उपसरपंच संतोष ननवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दौलतराव ननवरे यांना संविधान प्रत व उद्देशिका देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रकाशन व प्रसिद्धी विभागाचे रामदास लोखंडे यांनी संविधान दिंडी व समाज कल्याण व बार्टी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती यावेळी दिली.
लोकशाहीर जितेंद्र धाईजे यांनी केले गायनातून प्रबोधन - लोकशाहीर जितेंद्र धाईजे यांनी शाहिरीद्वारे संविधान जागृती करून संविधानाचे महत्व पटवून दिले. सोलापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रणिता कांबळे, माजी उपसरपंच मधुकर ननवरे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत ननवरे, बार्टी संस्थेतील समतादुत यांच्यासह ग्रामस्थ व वारकरी बांधव उपस्थित होते.
Become a valued partner with https://accsmarket.net and gain access to a vast array of verified accounts spanning multiple digital platforms.
Collaborate with us to expand your business opportunities and cater to the diverse needs of your clients effectively.
With our reliable platform and dedicated support, partnering with https://accsmarket.net ensures mutual success and growth in the competitive realm of online sales.
Click : https://accsmarket.net
Thanks you
Hmm it looks like your site ate my first comment (it was super long)
so I guess I’ll just sum it up what I submitted and say, I’m thoroughly enjoying your blog.
I as well am an aspiring blog blogger but I’m still new
to the whole thing. Do you have any tips for beginner blog writers?
I’d really appreciate it.
Also visit my homepage John E. Snyder