सोलापूर महानगरपालिका
महानगरपालिका सर्वसाधारण सेवकांची सहकारी पतसंस्थेचे निवडणूक बिनविरोध
- सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे संस्थापक लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सेवकांची सहकारी पतसंस्थेचे निवडणूक जाहीर होताच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या प्रयत्नाने ट्रेड युनियनचे सभासद माजी संचालक ,लक्ष्मण ( पिंटू) जेटीथोर, रतन भोसले ,विमल जेटीथोर सौ.द्रोपदी भडंगे, पुष्पा देसाई यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या माध्यमातून संस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी लोकनेते राजाभाऊ सरवदे यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी संचालक बिनविरोध होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका घेतली यावेळी प्रभुलिंग पुजारी,संतोष कांबळे,गौतम नागटिळक,रामचंद्र चंदनशिवे उपस्थित होते.