जागतिक ध्यानदिनाचे औचित्य साधून, संस्कार संजीवनी केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी “आनापान सती ध्यान ” शिबिर संपन्न.
जागतिक ध्यानदिनाचे औचित्य साधून, संस्कार संजीवनी केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी “आनापान सती ध्यान ” शिबिर संपन्न.
संस्कार संजीवनी फाऊंडेशन, सोलापूर संचलित अनाथ व गरीब मुलां-मुलींचे वसतिगृह, नरवडे नगर, हगलूर ता. उत्तर सोलापूर येथील, ८ ते १५ वर्षे वयो-गटातील मुलां-मुलींसाठी, दि. २१ डिसेंबर २०२४ रोजीच्या पहिल्या जागतिक ध्यानधारणा दिनाचे औचित्य साधून, रविवार दि. २२. डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत, विपश्यना ध्यान साधनेतील आनापान सती ध्यानाचे एक दिवसीय शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचे संचालन विरभद्र स्वामी (पुणे) व सुष्मा भंडारी (सोलापूर) यांनी केले. तर, नीलकंठ बगाडे, स्वाती काटे, सचिन मस्के, कविता बगाडे, शोभना मस्के, निलोफर सय्यद, वैभव सर्वगोड, शैलेश सुतार, रमेश खाडे यांनी सेवा दिली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे दातृत्व स्वीकारलेल्या पुणे येथील आभाळमाया फाऊंडेशनने योगदान दिले तर, उकरंडे सर, परमेश्वर काळे, अरुणा काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शिबिरात येथील ११ मुलींनी व १९ मुलांनी सहभाग नोंदवून, शिबिराचा लाभ घेतला. तसेच, दररोज सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना, असे आनापान सती ध्यान करण्याची तयारी दाखवली.