क्राईम
आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकाकडून सातवीच्या विेद्यार्थिनीवर अत्याचार
- मोहोळ : जिल्हा परिषद शाळेच्या एका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेल्या एका शिक्षकाने सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्या शिक्षकाच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. करण्यात आला आहे. दरम्यान, पळून निघालेल्या त्या मास्तराला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
- याबाबत पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर एका शिक्षकाची वाईट नजर होती. तो तिला वाईट नजरेने पाहायचा. तिला वर्गात बोलावून घ्यायचा. वर्गात आल्यानंतर तिच्या अंगाला हात लावायचा. त्याला विरोध केल्यानंतर माझ्याकडे तुझे प्रूफ आहेत, असे म्हणून ब्लॅकमेल करत होता. त्यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यांत कधी सकाळी वर्गात लवकर आल्यानंतर तर कधी दुपारच्या जेवणाच्या सुटीत आठवीच्या वर्गात बोलावून पीडित मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करीत ही घटना १५ एप्रिल रोजी उघड झाली.
- त्यानंतर पीडित मुलीला तिच्या पालकांनी विश्वासात घेऊन माहिती घेऊन तिला धीर दिला. नंतर रविवार दि. २३ रोजी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी त्या शिक्षकावर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुनगे करीत आहेत.
Join forces with https://SellAccs.net and thrive in the booming market of online account transactions! As a partner, you’ll gain access to a cutting-edge platform designed for seamless buying and selling experiences. Benefit from competitive commissions, extensive support, and a vast network of potential clients. Together, let’s redefine digital commerce and unlock new levels of success. Partner with https://SellAccs.net today to elevate your earning potential and expand your horizons!
CLICK THROUGH THE FOLLOWING ARTICLE: https://SellAccs.net