गुढीपाडवा पट वाढवा
गुढी पाडवा पट वाढवा सुरवसे प्राथमिक शाळेचा अनोखा अभियान
सोलापूर :सुरवसे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सुरवसे प्राथमिक शाळेचा पाडवा पट वाढवा या अभियानांतर्गत पहिलीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना प्रवेश देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दीपक डांगे ज्येष्ठ शिक्षिका वाडकर मॅडम बालक मंदिर विभागाच्या शुभांगी लोखंडे तसेच जेष्ठ लिपिक देवेंद्र होते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकांनी या अभियानाला चांगला प्रतिसाद दिला.
मुख्याध्यापक दीपक डांगे यांनी पालकांना आवाहन करताना असे सांगितले की आमच्या शाळेच्या वतीने इयत्ता पहिलीच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य देण्याचा संस्थेचा मानस आहे. तरी पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेश लवकरात लवकर घ्यावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Most relevant Post keep it up.
Sham Patil sir. Great job keep it up