सोलापूर निमा
आज वर्षातील सर्वात लहान दिवस, सर्वात माेठी रात्र
आज वर्षातील सर्वात लहान दिवस
सर्वात माेठी रात्र
मुंबई : आज शनिवारी वर्षातील सर्वात लहान दिवस असणार आहे.
दिवस अवघ्या पावणेअकरा तासांचा राहणार असून रात्र मात्र सवातेरा तासांची असणार आहे.
वर्षांत दोन दिवस सूर्य निश्चित ठिकाणी उगवतो.
त्याला विषुवदिन असेही म्हणतात.
सर्वात लहान दिवसाला अयन दिन असेही म्हणतात.
या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धाकडे झुकलेला असल्याने त्या भागात उन्हाळा आणि उत्तर गोलार्धात हिवाळा हा ऋतू असतो.
दक्षिण ध्रुवावर दीर्घ कालावधीची रात्र आणि उत्तर ध्रुवावर दीर्घ कालावधीचा दिवस सुरू होतो.
या दिवसापासून सूर्याचा प्रवास मकरवृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत सुरू होऊन २१ जूनपर्यंत चालतो.