मंथलीच्या लाेभापायी पाेलीस प्रशासनाचे अवैद्य धंद्याकडे काना डाेळा , अवैद्य धंद्याला ऊत
मंथलीच्या लाेभापायी पाेलीस प्रशासनाचे अवैद्य धंद्याकडे काना डाेळा
अवैद्य धंद्याला ऊत
सोलापुर : मंगळवेढा (प्रतिनिधी)
मंगळवेढा शहर अवैध धंदे चालकांचे माहेरघर झाले असुन बिनदिक्कतपणे मटका,पत्याचे क्लब,अवैध गुटखा चालू असल्याने शहरात पोलीसांचा धाक राहीला आहे की नाही ?
असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान येथे डी.वाय.एस.पी.दर्जाचे आधिकारी आसुन येथे सर्व काही खूले आम सुरू आसल्याचे नागरीकांच्या निदर्शनास येते आहे.
काेल्हापुर परिक्षेत्राचे विषेश पाेलीस महानिरीक्षक सुनिल फूलारी यांनीच आता लक्ष घालुन येथील आवैद्यधंदे हदपार करावेत आशी मागणी हाेत आहे.
तालुका मागील अनेक दिवसापासून अवैध वाळूसाठी चर्चेत आला आहे.
वाहाने पकडूनही कारवाई न करता हात मिळवणी करून पाेलीस साेडून पाेलीस स्टेशन आवारातुन देत आसल्याचा प्रत्यक्षदर्शनी नागरीकांचा आराेप आहे.
वाळू वसुलीमुळे वाहानाचा पाटलाग केल्याने वाहान पलटी हाेऊन ऐकाचा जिव जावुनही वाळू वसुली थांबता ..
थांबेना,
ताे पाेलीस आजूनही वरिष्ठाच्या आशिर्वादाने वसुली करत आसल्याच्या तक्रारी आहेत.
त्यातच ग्रामीण भागासह शहरांमध्ये अवैध धंद्याने डोके वर काढले आहे.
कहर म्हणजे शहरांमध्ये व ग्रामीण भागामध्ये सर्रास मटका चालक खुल्याआमपणे टपर्यावर,भर चाैकात चिट्टी देऊन मटका घेत असल्याने नेमकं या अवैध धंद्यांना अभय कोणाचं ? मिळाले आहे अशी चर्चा सामान्य लोक करत आहेत.
तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री , पत्त्याचे क्लब व मटका बुकीच पेव फुटलं आहे.
निवडणूक आचारसंहीतेत पाेलीसांना ऐकही दारू व्यवसाईक सापडला नसल्याने आशर्य व्यक्त करीत आहेत.
घरातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीं या जुगार व व्यसनांच्या आहारी जात असल्याने गावागावात कलह व सामान्य लोकांचे कुटुंब उध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहरांमध्ये पान टपरी व चौकामध्ये सर्रासपणे चिट्टी देऊन मटका जुगार चालू असल्याचे चित्र आहे. .
ग्रामीण भागामध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे.
प्रतिबंधित असणारा गुटखा काही किराणा दुकानांमध्ये उपलब्ध झाला असुन याचे व्यसनही लहान शाळकरी मुलांपर्यंत पोहोचले आहे.
पोलीस प्रशासनाचा वचक अवैध धंदे चालकावर राहिली नसल्याने ते बिंदिकतपणे हा व्यवसाय चालवत असल्याचे दिसत आहे.
प्रशासनाने वेळीच या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
डी.वाय.एस.पी. आधिकार्यांनी कार्यभार घेतल्यापासुन आवैद्य व्यवसायावर पथकाद्दवरे कारवाई केली नसल्याचा सुर नागरीकांचा आहे,
तत्कालीन डी.वाय.एस.पी.
राजश्री पाटील यांनी पथके तयार करून दाेन्ही तालुक्यात कारवाई करून आंकुश ठेवन्याचा प्रयत्न केला हाेता
तरीही आधिवेशनात प्रश्न मांडून संबधिताच्या चाैकशीची मागणी केली हाेती,
आता सर्वत्र खूले आम सुरू आसताना का प्रश्न आधिवेशनात मांडला जात नाही ?
आसा सवाल सुज्ञ नागरीककरीत आहेत.
मटका,पत्याचे क्लब,अवैध गुटखा नवनियुक्त लोकप्रतिनिधी तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री,पत्त्याचे क्लब,गुटख व मटका बुकीच पेव फुटलं आहे
या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का ?
याकडे तालुक्यचे लक्ष देणार का?
अशी चर्चा सामान्य लोक करत आहेत.