सोलापूर निमा

आईवडिलांनी मुलाच्या संसारात ढवळाढवळ करू नये.

*कौटुंबिक न्यायालयातील वादाचे खटले हाताळणाऱ्या न्यायाधीशांनी दिलेले दहा सल्ले!*

१) तुमच्याबरोबर एकाच घरात राहण्यासाठी मुलगा व सुनेला प्रोत्साहन देऊ नका. उलट त्यांनी नवे घर घेऊन त्याठिकाणी राहायला जाण्याची सूचना करा. वेगळे घर घेणे शक्य नसेल तर अगदी त्यांनी भाड्याने घर घ्यावे. वेगळे घर शोधणे ही त्यांची जबाबदारी आहे. तुमची नाही. मुलाचे कुटुंब व तुमच्यामध्ये जितके अंतर असेल तितके तुमचे नाते चांगले राहिल.

२) तुमच्या मुलाची पत्नी ही त्याची पत्नी आहे हे लक्षात घेऊन तिच्याशी वागा. ती तुमची मुलगी किंवा मैत्रीणीच्या नात्याने तिच्याशी वागायला जाऊ नका. तुमचा मुलगा नेहमीच तुमच्यासाठी लहान असतो. पण सुनेचे तसे नसते मुलावर रागवता म्हणून सुनेवर रागावला तर ती कायम लक्षात ठेवते. खऱ्या आयुष्यात फक्त तिची आईच तिला रागावू शकते किंवा चुका सुधारू शकते.

३) तुमच्या मुलाच्या पत्नीच्या सवयी, वागणे ही तुमची समस्या नाही. ती तुमच्या मुलाची समस्या आहे. ती तुमची समस्या नाही, कारण आता ती सज्ञान आहे.

४) अगदी तुम्ही एकत्र राहात असला तरी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या सुस्पष्टपणे सांगा त्यांचे कपडे धुणे किंवा त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे, मुले सांभाळणे अशी कामे करू नका. अगदीच सुनेने विनंती केली आणि ते काम करण्याची तुमची शारीरिक, मानसिक क्षमता असेल तरच ते काम करा. त्या कामाच्या बदल्यात त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलाच्या कौटुंबिक समस्यांची तुम्ही काळजी करू नका. त्यांच्या समस्या ते सोडवतील.

५) जेव्हा तुमचा मुलगा आणि सुनेदरम्यान वाद, भांडणे चालू असतील तेव्हा आपल्याला काहीच दिसत नसल्याची व ऐकू येत नसल्याची भूमिका घ्या. पती-पत्नीच्या नात्यामध्ये पालकांनी भाग घेऊ नये असे तरुण दांपत्याला वाटणे स्वाभाविक असते…
६) तुमची नातवंडे ही पूर्णपणे मुलगा आणि त्याच्या पत्नीची असतात. त्यांचे संगोपन कसे करायचे हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्याचे श्रेय किंवा अपश्रेय त्यांच्याकडेच जाईल.

७) तुमच्या मुलाच्या पत्नीने तुमची सेवा केली पाहिजे व आदर बाळगला पाहिजे असा नियम नाही ते तुमच्या मुलाचे कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे व्यक्तिमत्व घडवणे आवश्यक असते जेणेकरून त्याच्या पत्नीबरोबरील नाते अधिक चांगले राहील.

८) निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे योग्य नियोजन करा, निवृत्तीनंतर मुले सांभाळतील या भरवशावर राहू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोठा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि पुढच्या प्रवासात आणखी नव्या गोष्टी शिकायच्या आहेत हे लक्षात ठेवा.

९) निवृत्तीनंतरची वर्षे आनंदात घालवणे हे तुमच्या हिताचे असते. जे काही कमावले आहे, साठवून ठेवले आहे त्याचा वापर मृत्यूपूर्वी करणे सगळ्यात चांगले. आपली संपत्ती आपल्यासाठी शून्य होईल असे होऊ देऊ नका.

१०) नातवंडे ही तुमच्या कुटुंबाचा घटक नसतात. ती त्यांच्या आईवडिलांसाठीची अनमोल देणगी असते.

हे केवळ तुमच्यासाठी नाही तर हे दहा सल्ले तुमचे मित्र, पालक, नातेवाइकांनाही वाचायला द्या.
*कौटुंबिक_समुपदेशन*🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!