अल्पवयीन मुलीने भरदाव वाहन चालवत दुचाकीस्वारास उडवले.
दुचाकी स्वार जागीच ठार
सध्या पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असून एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत वेगाने आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याने दुचाकीवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. दरम्यान शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्नचीच पुनरावृत्ती झाली असून एका अल्पवयीन पोलिस पाटलाच्या मुलीने काल सकाळी मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा व्यक्ती जखमी झाला आहे. याबाबत शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे सतिश विठ्ठल मेमाणे (रा.वडगाव बांडे, ता. दौंड, जि. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली असुन काल सकाळी मयत अरुण विठ्ठल मेमाणे व त्याचा मित्र महिंद्र राउसाहेब बांडे हे दोघेही स्प्लेंडर मोटार सायकल वरून रोहित्राचे ऑइल आणण्यासाठी वडगावबांडे येथुन न्हावरे गावात निघाले होते. जाताना मोटारसायकल अरुण हा चालवित होता. त्याच्या पाठीमागे महिंद्र बसलेला होता. सदर मोटारसायकल अरणगाव (ता. शिरुर) येथे आली असताना त्यांच्या मोटार सायकलला अरणगावातील पिकअप (नंबर एम एच 12 एस एफ 3439) यावरील चालकाने समोरासमोर धडक दिली. यात दुचाकीचालक अरुण याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र हा जखमी झाला. सदर पिकअप अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी (अंदाजे वय 15) चालवत होती. तिच्यासोबत शेजारील सिटवर पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते. सदर मुलीने तिच्या ताब्यातील पिकअप हा जोरात, भरधाव वेगात चालवून हा अपघात केला आहे. तसेच अपघात झाल्यानंतर मदत न करता ते दोघेही पिकअप सोडून तेथून निघून गेले. याबाबत अल्पवयीन मुलीचे संतोष लेंडे यांच्यासह अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला आहे