क्राईम

उस्मानाबाद जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ऑक्सिजन युनिटमध्ये आढळला सडलेला मृतदेह प्रशासकीय यंत्रणेमध्ये खळबळ


उस्मानाबाद :- ( आप्पासाहेब सिरसाठे यांच्याकडून ) उस्मानाबाद जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या परिसरामध्ये करोना काळात करोना रुग्णांना गरजेप्रमाणे वेळेत ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध व्हावा म्हणून राज्य शासन व केंद्र शासन यांनी करोडो रुपये खर्च करून देशभरात व संपूर्ण राज्य सरकारच्या हत्यारित जिल्हा शासकीय रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी ऑक्सिजन तयार करण्याच्या युनिटची प्रत्येक रुग्णालयासमोर ऑक्सिजन निर्मित विभागाची निर्मिती तयार करण्यात आली याकरिता दोन्ही सरकारकडून करोडो रुपयाची उधळण करण्यात आली आणि हे ऑक्सिजन निर्मितीचे युनिट सुरक्षित राहावे म्हणून शासनाने या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवलेली होती परंतु
दोन वर्षानंतर करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि शासनाचे गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीप्रमाणे या ऑक्सिजन निर्मित युनिटची अवस्था झाली या युनिटकडे कोणाचेही लक्ष नाही या युनिटकडे संबंधित पूर्ण प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती युनिटची अवस्था झालेली दिसून आली या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तेव्हापासून या ठिकाणच्या सुरक्षेचे संपूर्ण व्यवस्थित व संपूर्ण वैद्यकीय सेवा प्रशासनाचे धिंडवडे निघाल्याचे आज सकाळी दिनांक १०/०६/२०२३ रोजी या ऑक्सिजन निर्मित युनिटच्या शेडमध्ये एक सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला या शेडमध्ये तो व्यक्ती गेला कसा त्याला जाऊ दिले कुणी तो मृत कसा झाला आशा अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत सदर व्यक्ती हा संपूर्णपणे सडलेल्या अवस्थेत दिसून आला
यामुळे सदर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वैद्यकीय प्रशासन किती ढिसाळ आहे याचा परिचय या गोष्टीवरून दिसून येतो
याबाबत काही कर्मचाऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की सदर युनिटचे शेड हे सतत कुलूप बंद असते यावरून तर या प्रकाराचा संशय अधिक गडद होताना दिसून येतो आणि संपूर्ण सुरक्षा व्यवस्था व सफाई कामगार तसेच वैद्यकीय संपूर्ण प्रशासन यांच्यावर गलथान कारभाराविषयी संशय उपस्थित होत आहे
सदर मृत व्यक्तीची बऱ्याच वेळानंतरही कसल्याही प्रकारची ओळख न पटल्यामुळे या ईसमावर नगरपरिषद उस्मानाबाद च्या कर्मचाऱ्यांनी याचा अंत्यविधी उरकून घेतला यावेळी नगरपालिका विभागाचे सफाई कर्मचारी यांनी या प्रेताचे अंत्यविधी केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!