सायाटीका कारणे आणि लक्षणे
सायटिका ही एक अशी स्थिती आहे जी सायटिक नर्व्हच्या मार्गावर पसरते, जी पाठीच्या खालच्या भागातून, नितंब आणि पायातून खाली जाते. यामुळे तुमच्या कंबरेपासून ते पायापर्यंत असह्य वेदना होतत. सध्याच्या काळात या आजाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. यासाठीच या लेखाच्या माध्यमातून आपण सायटिका म्हणजे काय? याची लक्षणं आणि कारणे कोणती? तसेच, या संबंधित संबंधित योग आसनं नेमकी कोणती आहेत हे जाणून घेणार आहोत.सायटिकाची सामान्य लक्षणे
कंबरेपासून पायाच्या मागच्या भागातून खाली पसरणारी तीक्ष्ण वेदना.
बाधित पायामध्ये सुन्नपणा किंवा मुंग्या येणे.
बाधित पायात अशक्तपणा.
दीर्घकाळ बसून किंवा उभे राहिल्याने वेदना वाढतात.
बाधित पाय हलवण्यास त्रास होतो.
ABP Majha – Marathi News
ABP Majha – Marathi NewsABP Majha – Marathi News
ABP Game Masti
ABP WhatsApp
मुख्यपृष्ठ लाईफस्टाईल आरोग्य Health Tips : सायटिका आजार नेमक कशामुळे होतो? वाचा लक्षणं, कारणं आणि योग उपाय
Health Tips : सायटिका आजार नेमक कशामुळे होतो? वाचा लक्षणं, कारणं आणि योग उपाय
एबीपी माझा वेब टीम
Updated at: 05 Jan 2024 11:40 AM (IST)
Edited By: प्रिया मोहिते
Health Tips : सायटिका हा आजार नसून समस्येचे लक्षण आहे जे सायटिक नर्व्ह च्या दबणे किंवा जळजळीशी संबंधित आहे.
Health Tips : सायटिका आजार नेमक कशामुळे होतो? वाचा लक्षणं, कारणं आणि योग उपाय
Health Tips
NEXTPREV
Health Tips : सायटिका ही एक अशी स्थिती आहे जी सायटिक नर्व्हच्या मार्गावर पसरते, जी पाठीच्या खालच्या भागातून, नितंब आणि पायातून खाली जाते. यामुळे तुमच्या कंबरेपासून ते पायापर्यंत असह्य वेदना होतत. सध्याच्या काळात या आजाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. यासाठीच या लेखाच्या माध्यमातून आपण सायटिका म्हणजे काय? याची लक्षणं आणि कारणे कोणती? तसेच, या संबंधित संबंधित योग आसनं नेमकी कोणती आहेत हे जाणून घेणार आहोत.
सायटिका म्हणजे काय?
Health Tips : सायटिका आजार नेमक कशामुळे होतो? वाचा लक्षणं, कारणं आणि योग उपाय
या संदर्भात मैत्री पाटील, निसर्गोपचार आणि योग तज्ञ यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्या म्हणतात, सायटिका हा आजार नसून समस्येचे लक्षण आहे जे सायटिक नर्व्हच्या दबणे किंवा जळजळीशी संबंधित आहे. सायटटिक नर्व्ह ही शरीरातील सर्वात लांब नर्व्ह आहे आणि कंबरेपासून खालच्या अंगांना संवेदना प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
सायटिकाची सामान्य लक्षणे
कंबरेपासून पायाच्या मागच्या भागातून खाली पसरणारी तीक्ष्ण वेदना.
बाधित पायामध्ये सुन्नपणा किंवा मुंग्या येणे.
बाधित पायात अशक्तपणा.
दीर्घकाळ बसून किंवा उभे राहिल्याने वेदना वाढतात.
बाधित पाय हलवण्यास त्रास होतो.
सायटिका होण्याची कारणे
Health Tips : सायटिका आजार नेमक कशामुळे होतो? वाचा लक्षणं, कारणं आणि योग उपाय
सायटिका बहुतेकदा खालील कारणांमुळे होते
हर्निएटेड डिस्क : जेव्हा मणक्यातील चकतीचा मऊ गाभा बाहेर येतो, तेव्हा ते सायटिक नर्व्ह दाबू शकते.
स्पाइनल स्टेनोसिस : स्पाइनल कॅनल अरुंद होणे, ज्यामुळे मज्जातंतूंच्या मुळांवर दबाव येऊ शकतो.
पिरिफॉर्मिस सिंड्रोम : नितंबातील पायरीफॉर्मिस स्नायू कडक झाल्यामुळे सायटिक मज्जातंतूला त्रास देतात.
स्पॉन्डिलोलिस्थेसिस : अशी स्थिती जिथे एक vertebrae दुसऱ्यावर सरकतो, आणि मज्जातंतूंच्या मुळांवर दाब आणतो.
आघात किंवा दुखापत : मणक्याला किंवा आसपासच्या tissue किंवा स्नायू ला झालेल्या दुखापतीमुळे सायटिक वेदना होऊ शकते.
सायटिकासाठी योग आसन :
सायटिका त्रास कमी करण्यासाठी योग हा एक प्रभावी पूरक दृष्टीकोन असू शकतो. खालील योगासने सायटिकामध्ये फायदेशीर ठरतात.
अशी’ घ्या काळजी
Maintain Good body posture : पाठीच्या खालच्या भागावरील ताण कमी करण्यासाठी शरीराचा योग्य posture ठेवा.
नियमित व्यायाम : शरीराची लवचिकता वाढवणारे व्यायाम नियमितपणे करावेत.
जड वस्तू उचलताना पूर्ण सावधपणे उचला.
दीर्घकाळ बसणे टाळा : विश्रांती घ्या आणि stretching exercise तुमच्या दिनक्रमात समाविष्ट करा.
योग्य पादत्राणे : योग्य बॉडी posture राखण्यासाठी सपोर्टिव्ह शूज निवडा.
थोडक्यात, सायटिका समजून घेण्यामध्ये त्याची लक्षणे ओळखणे, कारणे ओळखणे आणि त्यावर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणं गरजेचं आहे. यावर योगासने महत्त्वाची भूमिका बजावतात.