क्राईम

सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या गुंडाचा खरपूस समाचार घेतला.

शहरातील कोयता गँगचा विषय चर्चेत असतानाच बुधवारी (दि.२९) रात्री पुन्हा एकदा आंबेगाव येथील सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात कोयता घेऊन दोघांनी दहशत माजवली आरोपींनी वाहनांबरोबरच दिसेल त्या व्यक्तींवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ उडाली. यावेळी येथे गस्तीवर असलेल्या सिंहगड पोलिसांच्या दोघा कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून यातील एका अल्पवयीन आरोपीला पकडले. करण दळवी (रा.वडगाव) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे.

करण दळवी सोबतच पोलिसांनी त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न आणि आर्म ॲक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलिसांच्या हद्दीत घडली. मात्र, जवळच सिंहगड पोलीस ठाण्याचे मार्शल असल्याने त्यांनी पाठलाग करून आरोपीला पकडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव परिसरातील विधी महाविद्यालयासमोरील खाऊ गल्लीत रात्री दहाच्या सुमारास करण आणि त्याचा अल्पवयीन साथीदार कोयते फिरवत आले. त्यांनी सुरवातीला रस्त्त्यावर पार्क केलेल्या दुचाकींवर कोयत्याने वार केले.

यानंतर येथील एका हॉटेलमध्ये खुसून एका ग्राहकावर कोयत्याने हल्ला केला. तेथून पुढे रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केला, यानंतर आणखी एकाच्या पाठीवर प्लॅस्टीकचा स्टुल फेकून मारला.दोघांनी मिळून परिसरात तब्बल २० मिनिटे धुडगूस घातला होता.

सिंहगड पोलीस ठाण्याचे मार्शल धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले हे वडगाव हद्दीत गस्त घालत होते. याबाबत त्यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा दोघेही आरोपी नागरिकांवर कोयते उगारत चालले होते. पोलिसांनी बघताच दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटील आणि इंगवले यांनी पाठलाग करून अल्पवयीनाला ताब्यात घेतले. त्याच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!