महत्वाच्या बातम्या

वीज प्रकल्प खाजगीकरण विरूद्ध विविध संघटनेच्या आंदोलन

महाराष्ट्र राज्यातील सरकारच्या आधिपथ्याखली असलेल्या महावितरण,महापारेषण व महानिर्मिती या विजक्षेत्रातिल सरकारी विभागांना सध्याचे शिंदे/ठाकरे सरकारचा खाजगी गौतम अडाणी व इतर धनदांडग्या उध्योगपतिंना समांतर विजवाहीणीचा बेकायदेशीर परवाना देउन संपुर्ण राज्यातील विजप्रकल्प खाजगीकरण करन्याचा घाट घातला आहे.
सरकारच्या या धोरणाविरोधात आज दि.29/12/2022 रोजी जुनीमिल कंपाउंड , सोलापूर बाहेर महावितरण,महापारेषण,व महानिर्मिती कंपनितील जवळपास 30 विविध संघटना एकत्रीत येत संयुक्त रित्या आंदोलन केले.सदर आंदोलनात जिल्हयातील जवळपास सर्व अधिकारी व कर्मचारि तसेच कंत्राटी कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
शासनाने खाजगीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा.खाजगीकरणाचा निर्णय रद्द नाही केला तर यापुढे तिव्र आंदोलन करण्यात येणार आहे व राज्यातिल सर्व अधिकारी कर्मचारी बेमुदत उपोषणावर जाणार असा ईशारा प्रमुख पदाधिका ऱ्यांनी दिला.व सर्व कर्मचा ऱ्यांनी सदरचा लढा एकजुटिने लढावा असे आवाहन करण्यात आले.
सदर अंदोलनावेळी:-ओंकारनाथ गाये,तानाजी चटके,सुनिल काळे,पी.एल.जाधव,भारत नवगिरे,अनिल अंकोलिकर,विलास कोले,सुकुर शेख,संजय भोसले,गौरीष पाटील,संजय सुरवसे,यांनी संबंधितांना संबोधीत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!