सुरक्षित गर्भपात व कर्करोगावर कार्यशाळा संपन्न
सुरक्षित गर्भपात व कर्करोगावर कार्यशाळा संपन्न
*सोलापूर प्रतिनिधी (दि.२९) गर्भवती महिलांना सेवा देताना सहमती पत्र, शासनाने दिलेले सर्व फॉर्म त्याचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवावे. ४९ दिवसापर्यंतचा असलेला गर्भ गोळ्याद्वारे गर्भपात करावा. त्या पुढील गर्भपात शस्त्रक्रिये द्वारे केल्यास रुग्णास लवकर आराम मिळतो. या सेवा देताना शासकीय नियमात राहूनच डॉक्टरांनी रुग्णसेवा केल्यास व प्रलोभनांना बळी न पडल्यास आपल्याला नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. डॉक्टरांनी पोक्सो कायदा, एम.टी.पी. कायदा, पी.सी.पी.एन.डी.टी. कायदा यांविषयी जागृत असणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टरांनी आपल्या व्यवसायाशी निगडित कायदे विषयकज्ञान प्राप्त केले पाहिजे व त्यांची तंतोतंत अंमलबजावणी केली तरच त्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत असे मत सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूती शास्त्रतज्ञ डॉ. माधुरी दबडे यांनी व्यक्त केले.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा संचलित गारमेंट कामगारांकरिता सुरू असलेल्या लेव्ही स्ट्रॉस प्रकल्प अंतर्गत वस्ती पातळीवर सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांंकरिता *सुरक्षित गर्भपात, स्त्री नसबंदी, पुरुष नसबंदी व कॅन्सर याविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते* त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फॅमिली प्लॅनिंग चे मार्गदर्शक डॉ. श्रीकांत येळेगावकर हे होते.
यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ. शिरीष कुमठेकर, फॅमिली प्लॅनिंगच्या सचिवा डॉ. आयेशा रंगरेज, खजिनदार डॉ. एन. बी. तेली, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता चंडक आदी उपस्थित होते.*डॉ. शिरीष कुमठेकर यांनी कॅन्सर विषयी बोलताना म्हणाले की, भारतामध्ये दरवर्षी ४० ते ४५ टक्के मुखाचे कर्करोगाचे रुग्ण सापडतात. त्या खालोखाल स्तनाचे व गर्भाशयाचे कर्करोगाचे रुग्ण सापडतात. ६० टक्के कर्करोग वेळीच निदान झाल्यास व उपचार केले गेल्यास बरा होतो.
या कार्यशाळेत डॉ. जयश्री पाटील, डॉ. प्रमोद कसबे, डॉ. शितल काळे, डॉ. बागवान, डॉ. प्रमोद सलगरे, डॉ. योगेश पल्लेलू, डॉ. आयेशा मुंडेवाडी, डॉ. रेणुका गुर्रम, डॉ. सुधा फडके, डॉ. प्रकाश तोलानी, डॉ. महेश कबाडे, डॉ. अरुणा हावले, डॉ. तबस्सुम जमखंडी, डॉ. अनिता माळगे, डॉ. विजयालक्ष्मी होमकर, डॉ. पूजा साळुंखे, डॉ. ज्योती साळवे, डॉ. शगुप्ता बागवान, डॉ. सीमा शेख, डॉ. महादेव धुतर्गी, डॉ. जयश्री शेवाळे, डॉ. पायल पांढरे आदी उपस्थित होते.
स्वागत डॉ. एन. बी. तेली यांनी केले. प्रास्ताविक डॉ. आयेशा रंगरेज यांनी केले. सूत्रसंचालन सुगतरत्न गायकवाड यांनी केले तर आभार डॉ. योगेश पल्लेलू यांनी मानले.