माझा पक्ष लहान, कारण तुम्ही तो कधी मोठा होऊ दिला नाही… रामदास आठवलेंनी भाजपच्या वरिष्ठांना सुनावलं
परभणीत जो संविधानाचा अपमान झाला आहे. तो माथेफिरू नाही. त्याचे किराणा दुकान आहे. २५ एकर जमीन आहे. त्याने अपमान केला आहे. जवळपास ३०० लोकांवर केस घातले. ४२ लोकांना पकडले. १० लोकांना सोडले.
३२ पैकी एक लॉ चा मुलगा आहे. तो आंदोलनात नव्हता तरी पोलिसांनी त्याला पकडले. पोलीस मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्या पोलिसाने मारहाण केली त्याला बडतर्फ करावे आणि यासाठी शिष्टमंडळ भेटेल. त्या कार्यकर्त्यांचे गुन्हे मागे घ्यावे ही मागणी. आम्ही परभणी प्रकरणाचा निषेध व्यक्त करत आहोत असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी भाजपवर टीका केली आहे. यावेळी रामदास आठवले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. पण पाळले नाही. केंद्रीय नेतृत्वात अमित शाह यांच्याशी बोललो होतो. MLC आणि मंत्रिपद मिळावे ही मागणी होती. फडणवीस यांच्याशी बोला असे म्हटले होते. देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही.
हे नाव जाहीर झाली आहे. त्यावरून दिसत आहे. माझ्यासोबत कार्यकर्ते महायुतीसाठी काम करत राहिले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही हे खरे आहे. माझी पार्टी लहान आहे. कारण तुम्ही मोठी होऊ देत नाही. पार्टी मोठी आम्ही तुमची करतो, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे
महायुतीसोबत आम्ही आहोत ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आजच्या शपथविधीला मला बोलावले नाही. महादेव जानकार यांना कॅबिनेट दर्जा दिला होता. धनगर समाजाने मोठं मत दिले आहे. मी केंद्रात मंत्री आहे. त्यामुळे बाहेर पाडण्यात अर्थ नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेकडून शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसोबत देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू आहे. कोण मंत्री असावे ही नावे ठरवण्याचा अधिकार हे त्या त्या पक्षाला आहे. आमच्यासोबत नाही सध्या बच्चू. म्हणून काही मंत्र्यांना दिलाय डच्चू… असं रामदास आठवलेंनी सांगितले आहे