राजकीय
वंचित बहुजन आघाडीचे मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणसूर व गौतम हराळ यांच्यावर भ्याड हल्ला करणारा वर तात्काळ कारवाई करण्याची उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीची मागणी
- वंचित बहुजन आघाडीचे मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणसूर व गौतम हराळ यांच्यावर भ्याड हल्ला करणारा वर तात्काळ कारवाई करण्याची उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणीची मागणी
उस्मानाबाद ( आप्पासाहेब सिरसाठे यांच्याकडून) दिनांक २७ मे रोजी आंबेडकर भवन मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीची कार्यकारणी बैठक आयोजित केली होती या बैठकीस राज्यपारातून कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सध्या राज्यभरामध्ये विविध भागात वंचित बहुजन आघाडीचे माननीय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी मोठमोठ्या सभा होत आहेत या सभेचे औचित्य साधून मुंबईमध्ये बैठक आयोजित केली होती या बैठकीस उपस्थितीसाठी कार्यकर्ते व पदाधिकारी हजर झाले असता सायंकाळी ६-३०ते ७ च्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणसूर व वार्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर चार अज्ञात इस्मानी चाकू लोखंडी रोड इत्यादी साहित्यांनी भ्याड असा जीवघेणा हल्ला केला या हल्ल्याचा निषेध सर्व जिल्हा पातळीवर करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक यांना उस्मानाबाद जिल्हा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने हल्लेखोरावर तात्काळ कारवाई करावी म्हणून निवेदन देण्यात आले या निवेदनावर जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष आशिष लोंढे जिल्हा महासचिव धीरज शिंदे जिल्हा संघटक काशिनाथ वाघमारे जिल्हा प्रवक्ता गोविंद भंडारे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कृष्णा शिंगारे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव जिल्हा कार्यकारणी सदस्य तानाजी बनसोडे व युनिव्हस पटेल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या निवेदनाच्या प्रती गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांनाही देण्यात आलेले आहेत.