राजकीय
रिपाइं (आठवले)उस्मानाबाद जिल्हा व सर्व तालुका कार्यकारण्या बरखास्त तात्पुरती जिल्हा समिती गठीत : प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे
- रिपाइं (आठवले)उस्मानाबाद जिल्हा व सर्व तालुका कार्यकारण्या बरखास्त तातपुर्ती जिल्ह्या समन्वय समिती गठीत : प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे
————————-
उस्मानाबाद (प्रतिनिधी):
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी सह सर्व तालुका कार्यकारण्या सर्व आघाडी कार्यकारण्या बरखास्त करण्यात येत असून तातपुर्ती एकच जिल्ह्या समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. तेंव्हा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सक्रीय सभासद नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी व तसेच दि.२८ मे २०२३ रोजी शिर्डी येथे होणाऱ्या रिपाइं (आठवले) च्या महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवहान रिपाइं (आठवले)चे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनीउस्मानाबाद येथे आयोजित बैठकीत केले आहे.
दि.१३ मे २०२३ रोजी उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात रिपाइं (आठवले)चे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक संपन्न झाली. या बैठकित रिपाइं च्या जिल्ह्यातील क्रियाशील सभासद नोंदणी चा आढावा घेण्यात आला. तसेच दि.२८ मे रोजी शिर्डी येथे होणाऱ्या रिपाच्या राष्ट्रीय महामेळाव्याची पूर्वतयारी या बाबत चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील सक्रीय सभासद नोंदणी प्रक्रिया अपुर्ण असून प्रतेक तालुक्यात किमान ५० ते ६० सक्रिय सभासदांची नोंदणी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या रिपाइं च्या जिल्ह्यातील सर्व कार्यकारण्या बरखास्त करून जिल्ह्यात तातपुर्ती एकच जिल्हा समन्वय समिती गठीत करण्यात आली असून ती पुढील प्रमाणे राजाभाऊ ओव्हाळ,संजय बनसोडे, आनंद पांडागळे,तानाजी कदम,विद्दानंद बनसोडे,एस.के.गायकवाड, प्रकाश कांबळे,अरूण लोखंडे,आदीची निवड करण्यात आली.यावेळी रिपाइंचे एस.के.चेले, भालचंद्र कठारे, सोमनाथ गायकवाड,प्रवीण बनसोडे, उदय बनसोडे, अरुण कदम,शंकर हावळे,शुभम कदम,मुकुंद मोठे,,अमोल कदम,अतिश कदम,तानाजी सोनवणे,मटकीवाले pratap kadam सह जिल्ह्यातील रिपाइं कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.