राजकीय

नवीन जी. आर. काढून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी कमी करण्याचे षड़यंत्र सुर :- प्रणिती शिंदे

  1. नवीन जी. आर. काढून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी कमी करण्याचे षड़यंत्र सुर :- प्रणिती शिंदे

    👉 संजय गांधी निराधार आणि श्रावण योजनेच्या लाभार्थ्याना एकवीस हजाराचे उत्पन्न दाखला आणि हयात दाखले दरवर्षी सादर करण्याच्या सक्तीच्या भाजप सरकारच्या शासन निर्णयाची आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने होळी करून भाजप सरकारच्या नावाने बोंबाबोंब करण्यात आली.

    👉 धनदांडग्यासाठी काम करणारे पन्नास खोक्याच्या सरकारने निराधारांना सोडले वाऱ्यावर

    दिनांक:- १७ मे २०२३

    संजय गांधी निराधार आणि श्रावण योजनेच्या लाभार्थ्याना हयात दाखला आणि एकवीस हजाराचे उत्पन्न दाखले दरवर्षी सादर करण्याच्या सक्तीच्या भाजप सरकारच्या शासन निर्णयाची (जी आर ) आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने ७० फुट भाजी मार्केट चौक येथे होळी करण्यात आली.
    यावेळी भाजपा सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने बोंब मारत निषेध करण्यात आला.

    यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की,
    २०१९ साली तत्कालीन भाजपा सरकारने संजय गांधी निराधार आणि श्रावण योजनेच्या लाभार्थ्यानी हयात दाखला आणि एकवीस हजाराचे उत्पन्न दाखले दरवर्षी सादर करावे असा निर्णय घेतला आणि जे सादर करत नाहीत त्यांचे अनुदान बंद करण्याचे आदेश दिले. पण महाविकास आघाडी सरकारने दाखल्याची सक्ती न करता पूर्वीप्रमाणे अनुदान वाटप सुरु ठेवले पण आत्ता दाखले सादर करण्याची सक्ती केली जात आहे. पण ज्या लाभार्थ्यांना सर्व कागदपत्रे, एकविस हजाराचा उत्पन्न दाखला देऊन योजना लागू झाली त्यांच्याकडून वारंवार उत्पन्न दाखला आणि हयात दाखला दरवर्षी घेण्याची गरज काय? सध्या सेतु कार्यालय बंद आहे. शासनाकड़ून त्याचे टेंडर काढले जात नाही. महाईसेवा केंद्रातुन जास्त पैसे घेतले जातात वृद्ध, गरीब, अशिक्षित लाभार्थ्यांना एकविस हजाराचे उत्पन्न दाखले दिले जात नाहीत. यासाठी त्यांना वणवण फिरावे लागत आहे. मग दाखले कुठून सादर करायचे. उत्पन्न दाखल्याची मर्यादा एकविस हजार ऐवजी एकावन्न हजार करण्यात यावी यासाठी वारंवार विधानसभेत आवाज उठवून ही शासन निर्णय घेत नाही. भाजपा सरकारला लाभार्थी कमी करायचे आहेत. काँग्रेसच्या योजनेमुळे निराधार गोर गरीबांना एक हजार पेंशन मिळायचे ही योजना बंद पाडायची आहे. या आठ नऊ वर्षात मोदी सरकारने आणि भाजपने गोरगरीबांसाठी एकही योजना आणली नाही हे मायबाप सरकार नसून पन्नास खोक्याचे सरकार आहे. धनदांडग्यासाठी काम करणारे सरकार आहे. म्हणून आज रोजी निराधार आणि गोरगरीबांना त्रास देणाऱ्या भाजप सरकारच्या शासन निर्णायाची (जी.आर.) होळी करण्यात आली. जोपर्यंत हा निर्णय मागे घेत नाहीत तो पर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करणार असल्याचे सांगितले. तसेच सेतु कार्यालय चालु करून निराधार आणि नागरिकांना लवकरात लवकर सर्व दाखले देण्यात यावे अशीही मागणी केली.

    अध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, मा नगरसेवक रियाज हुंडेक़री, प्रवीण निकाळजे, आरिफ शेख, हाजी तौफ़ीक़ हत्तूरे, विनोद भोसले, रमेश राठी, मा. नगरसेविका परवीन इनामदार, अनुराधा काटकर, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, भीमाशंकर टेकाळे, वाहिद बीजापुरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, लक्ष्मीकांत साका, तिरुपती परकीपंडला, नागेश बोमडयाल, अंबादास नडगिरी, श्रीकांत वाडेकर, गणेश सालुंखे, मीरा घटकांबळे, प्रमिला तुपलवंडे, संघमित्रा चौधरी, बसवराज म्हेत्रे, विवेक कन्ना, प्रवीण जाधव, दाऊद नदाफ, रफीक चकोले, अनंत म्हेत्रे, अनिल जाधव, युवराज जाधव, एजाज बागवान, प्रतीक आबूटे, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले,धोंडप्पा तोरनगी, प्रकाश गेंटयाल, अनिल मस्के, अप्पासाहेब बगले, शिवशंकर अंजनाळजर, सत्यनारायण संगा, संजय गायकवाड़, नागनाथ कदम, राजन कामत, सुभाष वाघमारे, सायमन गट्टू, रूपेश गायकवाड, सत्यनारायण संगा, मल्लीनाथ सोलापुरे, नूर अहमद नालवार, रमेश जाधव, राजेन्द्र शिरकुल, श्रद्धा हुल्लेनवरु, अरुणा बेंजरपे, श्रीशैल रणधीरे, दिनानाथ शेळके, वसिष्ठ सोनकांबले, रमेश जाधव, शाहु सलगर, दनयनेश्वर जाधव, धीरज खंदारे, बालाजी जाधव, शाहु सलगर, नरेश येलूर, महेंद्र शिंदे, नागनाथ शावने, शिवानंद बळूरगी, आनंद गायकवाड़, परशुराम जाधव, बसु कोळी, लक्ष्मण पडोरे, परशुराम आनंदकर, सूरज चव्हाण, हूसेन शेख, बाबा शेख, यांच्यासह इतर नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!