महा एनजीओ फेडरेशनच्या आढावा बैठकीत विविध सामाजिक प्रश्नांवर झाले विचार मंथन ! 90 हून अधिक सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग !
- महा एनजीओ फेडरेशनच्या आढावा बैठकीत विविध सामाजिक प्रश्नांवर झाले विचार मंथन !
90 हून अधिक सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग !
सोलापूर : महा एनजीओ फेडरेशनच्या सोलापुरातील बैठकीत विविध सामाजिक प्रश्न व समस्या तसेच सामाजिक संस्थांच्या अडी अडचणींवर विचार मंथन झाले. पुढील काळात सामाजिक संस्थांसाठी विशेष कार्यशाळा आयोजनाचा निर्णय घेण्यात आला. यावेळी 90 हून अधिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदविला.
महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने सोलापूर मधील सामाजिक संस्थाची आढावा बैठक सोनी महाविद्यालय सैफुल येथे पार पडली. या बैठकीला 90 पेक्षा जास्त सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सामाजिक संस्थांची आढावा बैठक घेण्यात येत आहे. त्याची सुरुवात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्या या बैठकीने शनिवारी झाली. या बैठकीमध्ये दक्षिण सोलापूरचे आ. सुभाष देशमुख, महा एनजीओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे, संचालक अमोल उंबरजे , गणेश बाकले, समन्वयक महेश कासट, मनोज देवकर आणि विजय जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सामाजिक संस्थांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. पुढील काळात सामाजिक संस्थांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणत्या विषयावर आयोजित करता येईल याबाबत विचारविनिमय करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवातीला संचालक अमोल उंबरजे यांनी महा एनजीओ फेडरेशनच्या कार्याचा आढावा घेतला. भूमिका स्पष्ट केली.
त्यानंतर ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी महा एनजीओ फेडरेशन द्वारे सामाजिक संस्थांना कशाप्रकारे मदत करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. संचालक गणेश बाकले यांनी सामाजिक संस्था एकत्रित येऊन कसे काम करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. सामाजिक संस्था चालविताना येणाऱ्या अडचणीवर विशेष चर्चासत्र झाले.
आमदार सुभाष देशमुख यांनी सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधला. महा एनजीओ फेडरेशन द्वारे सोलापुरात शेखर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यालय स्थापन करून सोलापूर शहर व जिल्ह्यातील संस्थांना कशी मदत करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. सामाजिक संस्थांना येणाऱ्या अडचणी महा एनजीओ फेडरेशन द्वारे कश्या सोडवता येईल याबाबत चर्चा केली.
समन्वयक महेश कासट व विजय जाधव यांनी सामाजिक संस्थेच्या वतीने आपले मत मांडले. या आढावा बैठकीचे सूत्रसंचालन मनोज देवकर यांनी केले. तर आभार विजय जाधव यांनी मानले.सोनी महाविद्यालयाच्या संचालिका वासंती अय्यर यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.