बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती महामंडळ यांच्यावतीने मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व नगर अभियंता लक्ष्मण चलवादी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने 13 एप्रिल ते 23 एप्रिल पर्यंत सोलापूर शहरांमधील रस्ते दिवाबत्ती पाणी महिलांसाठी मोफत सिटी बस सोय करण्याबाबत तसेच मिरवणूक मार्गावरील अडथळे यासंदर्भात चर्चा
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती महामंडळ यांच्यावतीने सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 132 व्या जयंतीनिमित्ताने दिनांक 6 एप्रिल रोजी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांच्या उपस्थितीमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंती निमित्ताने 13 एप्रिल ते 23 एप्रिल पर्यंत सोलापूर शहरांमधील रस्ते दिवाबत्ती पाणी महिलांसाठी मोफत सिटी बस सोय करण्याबाबत तसेच मिरवणूक मार्गावरील अडथळे यासंदर्भात चर्चा झाली याप्रसंगी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी श्री संदीप कारंजा यांची व नगर अभियंता या पदावर श्री लक्ष्मण चालवादी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी महामंडळाचे सर्व विश्वस्त व उत्सव कमिटी भीमसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते