महत्वाच्या बातम्या
शहराला पाणीपुरवठा एक दिवस उशीरा होणार !
-
शहराला पाणीपुरवठा एक दिवस उशीरा होणार !———————————————उजनी जवळ विद्युत पुरवठा खंडित झाल्यानेशहराचा पाणीपुरवठा विस्कळीत !———————————————उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामाच्या पूर्व नियोजनासाठी आयुक्तांनी केली पाहणी !————————————————सोलापूर : उजनी जवळील माने गावाजवळ एमएसईबीच्या पोलवर वीज कोसल्यामुळे काल रात्री 9 वाजल्या पासून उजनी पंप हाऊस येथील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. त्या ठिकाणी आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी पाहणी केली.अद्यापही वीज पुरवठा सुरू नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या.दरम्यान, वीजपुरवठा खंडित असल्यामुळे सोलापूर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.एक दिवस पाणी पुरवठा पुढे जाणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी. नागरिकांना पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली – उगले यांनी केले.दुहेरी जलवानीचे कामलवकरच होणार सुरूउजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनी 170 एमएलडी पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज पूर्व नियोजनासाठी पंपिंग हाऊस, जॅकवेल,उजनी येथील इंटकवेल,नवीन होणारे 170 एमएलडीचे इंटकवेल, कॉपर डॅम, नवीन होणारे 170 एमएलडीचे बी.पी.टीची जागा, एक्सप्रेस फीडर लाईन, सध्या सुरू असलेल्या खंडाळा येथील बी.पी.टीची जागा आदी ठिकाणाची पाहाणी करून आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यकरी अभियंता विजय राठोड, उपअभियंता व्यकटेश चौबे, उपअभियंता नीलकंठ मठपती, सहायक अभियंता संतोष यलगुलवार, अवेक्षक गणेश काकडे, इलेक्ट्रिक सुपरवायझर नितीन आंबीकर आदी उपस्थित होते.