महत्वाच्या बातम्या

लवकरच 8 वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता

 

केंद्रात लोकसभा निवडणुका संपल्यानंतर देशाचे तिसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. आता सरकार स्थापन झाले व त्यानंतर आता नागरिक आणि देशातील केंद्रीय कर्मचारी यांच्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता हे सरकार कामाला लागले असून आगामी दिवसात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. याचदरम्यान आता आठवा वेतन आयोगाची चर्चा सुरु झाली आहे. कारण आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत सरकारला शिफारसी पाठवेल आणि त्यानंतर सरकार 8वा वेतन आयोग लागू करेल. आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होण्याची अपेक्षा आहे. याआधी सरकार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करत आहे. जानेवारी २०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. तसेच देशातील पहिला वेतन आयोग जानेवारी 1946 मध्ये स्थापन करण्यात आला होता. त्यानंतर आता आठवा वेतन आयोग कधी लागू होणार अशी चर्चा सुरु आहे.

सध्या, 8 व्या वेतन आयोगाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीशी संबंधित औपचारिक माहिती भारत सरकारने सामायिक केलेली नाही. डिसेंबर 2023 मध्ये सरकारने सांगितले होते की, सध्या 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेशी संबंधित कोणतीही योजना नाही. आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या असून नवीन वेतन आयोग स्थापन करण्यासंदर्भात कोणते सरकार पहिले मोठे पाऊल उचलू शकते? याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. वेतन आयोग स्थापन झाल्यापासून 12-18 महिन्यांच्या आत आयोग आपल्या शिफारसी सादर करण्यात येतो.

8 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सुमारे 49 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. 8वा वेतन आयोग आल्यानंतर त्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढू शकतो. म्हणजेच ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे, त्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यामुळे मूळ वेतन 8000 रुपयांनी वाढून ते 26000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

फिटमेंट फॅक्टर हे सूत्र आहे, जे 8 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार आणि वेतन मॅट्रिक्समध्ये मदत करते. सध्याची 7वी CPC वेतनश्रेणी प्रस्तावित 8व्या CPC वेतनश्रेणीच्या अनुषंगाने समायोजित करणे ही त्याची प्राथमिक भूमिका असेल. तर 7 व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 पट लागू करण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 14.29 टक्क्यांनी वाढ झाली असून, किमान वेतनश्रेणी 18 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

एकदा लागू झाल्यानंतर, 8 व्या वेतन आयोगाने विविध कर्मचारी गटांमधील वेतन असमानता दूर करणे, महागाईचा प्रभाव कमी करणे अपेक्षित आहे. 8वा वेतन आयोग आल्यानंतर सुधारित वेतनश्रेणी आणि सेवानिवृत्तीचे फायदे यांसारखे इतर अनेक फायदेही मिळतील. सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त, लष्करी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही 8 व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!