अजितदादा गटातील आमदार शरद पवारांच्या पक्षात जाणार???
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी बोलावलेल्या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारली होती. परिणामी अजितदादा गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. रोहित पवारांनी अजितदादा गटाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान केले होते. दरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळेंनी याबाबत भाष्य केले.
काल आज शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीला सर्व राज्यातील अध्यक्ष हजर राहिले होते. त्यानंतर सुळेंनी पत्रकार परिषद घेतली.
अजितदादा गटातील आमदार परत येणार का, असे विचारले असता सुळे म्हणाल्या की, काही आमदार परत येत असतील असतील तर त्यासंदर्भात आमची वर्किंग कमिटी निर्णय घेईल. माझ्या पोटात खूप काही राहते, परिणामी मी यावर बोलणार नाही. जर कोणी परत येण्याचा विचार करत असेल, तसा प्रस्ताव आला तर त्यावर जेष्ठ नेते शरद पवार आणि वर्किंग कमिटी निर्णय घेईल, असे सुळे