क्राईम
मालट्रकचा कट लागल्याने गाडीचा ताबा सुटल्याने ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
- जड वाहतूकीचा आणखी एक बळी
-
तानाबाना चौकात मालट्रकचा मोटारसायकलला कट लागल्याने गाडीवरील आजी नातू खाली पडल्याने नातूचा जागीच मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.सोलापूर शहराच्या प्रमुख महामार्ग असलेल्या तानाबाना चौकात मालट्रकचा मोटारसायकलला कट लागल्याने गाडीचा ताबा सुटल्याने गाडीवरील दोन जण खाली पडले .
-
यात एका तीन वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्या बालकाला कडेवर घेऊन बसलेल्या आजी मुमताज सरतात बागवान या खाली पडल्याने त्याही गंभीर झाले आहेत.यामधील गाडीचालक मृत बालकांचे आजोबा सरताज ह्यांना काही झाले नाही.
-
या घटनेनं अक्कलकोट येथील कर्जाळचे रहिवासी बागवान कुटुंबियांवर आघात कोसळला आहे. शांती चौकातून तानाबाना चौकाजवळ आल्यानंतर मोटारसायकलवरील बागवान हे आपल्या MH 13 BS 8377 या गाडीवरून वळण घेण्यापूर्वी आपल्या वाहनाचं इंडीकेटर चालू ठेऊन गाडी वळविण्याचा प्रयत्न करत असतानाच मालट्रक MH13 CU 0194 या गाडीचं कट लागल्याने गाडीचा ताबा सुटला आणि पुढील अनर्थ घडला. या घटनेत तीन वर्षीय असद अल्ताफ बागवान या बालकांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.
-
या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची रेलचेल आहे.हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरून विजापूर, अक्कलकोटकडे जाणारी जलवाहतूक, याशिवाय विजापूरहून अक्कलकोट,पुणे, हैद्राबाद या मार्गावर जाण्यासाठी गुरूनानक चौक, अशोक चौक,ताना बाना चौक,पाणी टाकी, शांती चौक,बोरामणी नाका हा मधला मार्ग आहे.
-
याच मार्गावरून शहरातील पुर्व, पश्चिम भागात जाण्यासाठी मुख्य मध्य मार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी असते.
-
आणि विशेष म्हणजे या प्रमुख मार्गावर अद्यापही जागोजागी खड्डे आहेत.खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकांना आपला जीव गमवावा लागला.
-
ताना बाना चौकात घडलेला अपघातही त्यातलाच प्रकार आहे.
-
ताना बाना चौकात चोहोबाजूंनी खड्डे आहेत.हे प्रशासनाला वारंवार सांगूनही प्रशासनाकडून चालढकल होतोय यांचा परिणाम अशा पध्दतीने होत असल्याने नागरिकांतून व्यक्त होत आहे.
-
या घटनेची माहिती कळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोगल ,शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक व वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.
-
या घटनेतील मालट्रक चालकाला पोलीस ताब्यात घेतले असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात बागवान कुटूंबियांनी गर्दी केली आहे.