क्राईम
अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग
- सोलापूर : सोलापूरमधील सांगोला तालुक्यातील कोळा येथे शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका शाळेत स्नेहसंमेलन कार्यक्रम होता. यावेळी यात सहभागी अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केला आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत त्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. A teacher molested a student, tell the incident in Solapur district
आपल्या मुला-मुलींचे कला गुण पाहण्यासाठी पालकांसह नातेवाईकांची स्नेह संमेलनासाठी माेठ्या प्रमाणात उपस्थिती असते. नटून थटून आलेल्या मुलां-मुलींवर काही वेळेला अपप्रवृत्तींचा डाेळा पडताे आणि क्षणात हाेत्याचे नव्हते हाेते. असाच प्रकार नुकताच सोलापूर जिल्ह्यात घडला आहे.
- या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर पाेलिसांनी शिक्षकावर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सांगोला पोलिसांनी शिक्षकास अटक केली. या घटनेचा सांगाेल पाेलिस कसून तपास करीत आहेत.