आमदार जयकुमार गोरे अपघातात गंभीर जखमी
आमदार जयकुमार गोरे अपघातात गंभीर जखमी
पुणे : सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहेत.
या अपघातात गोरे यांच्यासह दोन जण जखमी झाले आहेत.
त्यांची नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातात जयकुमार गोरे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात झाला.
बानगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे.
माण-खटाव मतदार संघातील गोरे यांचे समर्थक रुबी हॉल येथे पोहचले आहे.
गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाँक्टरांनी सांगितले.