निमा अमृत महोत्सव वर्षी निमित्त एन.ए.बी.संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्यावतीने एन.ए.बी.निवासी अंधकार्य शाळा कर्णिक नगर सोलापूर येथे आरोग्य तपासणी शिबीर
निमा अम् त महोत्सव वर्षी निमित्त
एन.ए.बी.संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्यावतीने एन.ए.बी.निवासी अंधकार्य शाळा कर्णिक नगर सोलापूर येथे
आरोग्य तपासणी शिबीर मध्ये
बी.पी.(उच्च रक्तदाब तपासणी व मधुमेह रोग तपासणी )शिबीर करण्यात आली.
सदर या तपासणी शिबीर चे अध्यक्ष
म्हणून नँब सोलापूर चे खजिनदार तथा चेअरमन अम् त महोत्सव समिती निमा सोलापूर मा.श्री.डॉ. चंद्रकांत कुलकर्णी व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रविराज गायकवाड (अध्यक्ष निमा संघटना सोलापूर),डॉ. सचिन बोंगरगे(सेक्रेटरी, निमा संघटना सोलापूर) डॉ. नागनाथ जिडीमनी खजिनदार ,निमा संघटना सोलापूर.) कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री.शशीभुषण यलगुलवार (सेक्रेटरी, नँब सोलापूर)
मा.देवेंद्र भंडारे सर अधिक्षक नँब सोलापूर व श्री रामचंद्र कुलकर्णी सर उप अधिक्षक व श्री रियाज मुल्ला सर यांची उपस्थिती होती.
शिबिरात आरोग्य तपासणी बरोबर आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी व आरोग्य संवर्धन करण्यात प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शन व आरोग्य शिक्षण व मोफत औषधोपचार देण्यात आले आहे.
यावेळी डॉ. कुलकर्णी ,डॉ. गायकवाड, डॉ. बोंगरगे, डॉ. जिडीमनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. शिबिरात 45जणांची आरोग्य तपासणी करण्यात आले आहे.