महत्वाच्या बातम्या
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील मठाचे मठाधीश श्री ष.ब्र.रेणुकाचार्य शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी वय ६५ यांचे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उपचारादरम्यान अश्विनी रुग्णालयात निधन
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील मठाचे मठाधीश श्री ष.ब्र.रेणुकाचार्य शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी वय ६५ यांचे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उपचारादरम्यान अश्विनी रुग्णालयात निधन झाले आहे.श्री रेणुकाचार्य शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी आज नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी पूजेसाठी बसत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले.
यावेळी त्यांचे बंधू संगमनाथ हिरेमठ आणि इतरांनी त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात हलविले.
यावेळी उपचारादरम्यानच रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामीजी हे लिंगैक्य झाले. त्यांच्या लिंगैक्यामुळे वीरशैव लिंगायत समाजासह इतर समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.