भगवान भुसारी व डॉ. अग्रजा चिटणीस- वरेरकर यांचा एन.एम.पी. प्लस व एन.एस.ओ.पी. प्लस संस्थेकडून सत्कार
भगवान भुसारी व डॉ. अग्रजा चिटणीस- वरेरकर यांचा एन.एम.पी. प्लस व एन.एस.ओ.पी. प्लस संस्थेकडून सत्कार
सोलापूर (दि.१) जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत समाज बांधिलकीची जाणीव ठेवून ए.आर.टी. औषधांच्या तुटवड्या दरम्यान एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्या समूहाकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल लिविंग विथ एच. आय. व्ही. यांनी घेवून १ डिसेंबर २०२२ च्या एच. आय. व्ही. एड्स जनजागृती दिंडीच्या उद्घाटन कार्यक्रमात *जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण संस्थेचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी भगवान भुसारी व ए.आर. टी. प्लस विभागाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस- वरेरकर यांचा नेटवर्क ऑफ सोलापूर बाय पीपल लिव्हिंग विथ एच.आय. व्ही.संस्थेचे अध्यक्ष समाधान माळी व प्रकल्प समन्वयिका विजयश्री आमले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल बुके व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.*
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) दिलीप स्वामी, पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे, फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेचे डॉ. श्रीकांत येळेगावकर, कॅन्सरतज्ञ डॉ. पराग कुमठेकर, डॉ. एन.बी. तेली, डॉ. बी. एन. कांबळे, आनंद लांडगे, आदी उपस्थित होते.
भगवान भुसारी व डॉ. अग्रजा चिटणीस – वरेरकर यांनी केलेल्या कार्याबद्दल नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल लिव्हिंग विथ एच.आय.व्ही. पुणे.यांनी अभिनंदन व्यक्त केले.