शेतकरी आणि वारकर्यांसाठी विमानसेवा अत्यावश्यक :महा एन.जी.ओ. फेडरेशन आणि वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र ह्या राज्यस्तरीय संघटनांचा सोलापूर विकास मंचच्या चक्री उपोषणास सक्रिय पाठिंबा
शेतकरी आणि वारकर्यांसाठी विमानसेवा अत्यावश्यक
_महा एन.जी.ओ. फेडरेशन आणि वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र ह्या राज्यस्तरीय संघटनांचा सोलापूर विकास मंचच्या चक्री उपोषणास सक्रिय पाठिंबा_
शेतकरी, कष्टकरी आणि गरिबांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरातील विठ्ठलाच्या आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वारी साठी महाराष्ट्रासहित देशा विदेशातील भक्तगण विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. विठुरायाचे मनोभावे पूजा आणि दर्शन घेण्यासाठी होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू झाली तर निश्चितच वारकरी, भक्तगण आणि अभ्यासकांना ते फायदेशीर ठरेल असा विश्वास वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्राचे अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील २५०० पेक्षा जास्त सामाजिक संस्था संलग्न असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी संस्थापक शेखर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या महा एन.जी.ओ. फेडरेशन ही संस्था नेहमीच समाजाच्या विविध मुद्दय़ांवर काम करणाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे. सोलापूर शहरात उद्योगधंदे, बहुराष्ट्रीय आस्थापने, शेतीपूरक व्यवसाय, यंत्रमाग उद्योग कार्यरत आहेत. ह्या व्यवसायांच्या वाढीसाठी होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होणे ही काळाची गरज आहे. होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू झाल्यास सोलापूरातील गुंतवणूक नक्कीच वाढेल असा आशावाद महा एन.जी.ओ. फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांनी व्यक्त केला. अग्रवाल सेवा समिती ट्रस्ट, सोलापूरचे सर्व पदाधिकारी आदी संघटना आणि व्यक्ती यांनी चक्री उपोषणासाठी सक्रिय पाठिंबा दर्शविला.
सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होई घर आणि कार्यालयाच्या दर्शनी भागात काळे झेंडे लावण्याच्या आवाहनाला सोलापूरकर भरभरून प्रतिसाद देत आहेत. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, गणेश पेनगोंडा, सुहास भोसले, अरविंद रंगा, सुभाष लोणावत, अॅड.दत्तात्रय अंबुरे, गणेश शिलेदार, अनंत कुलकर्णी, आनंद पाटील, सुहास भोसले, मनोज क्षीरसागर, विकास गोसावी, श्रीकांत बनसोडे, प्रसन्न नाझरे, गणेश शिलेदार, सुर्यकांत पारेकर, इक्बाल हुंडेकरी, अर्जुन रामगिर, राजेंद्र चव्हाण, शुभम जाधव, यशवंत बोधे, गौरी आंमडेकर, सहदेव इप्पलपल्ली, विजय कुंदन जाधव आदी सदस्य उपस्थित होते. उपोषणस्थळी सुरू असलेल्या सह्यांच्या मोहिमेस सोलापूरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे, आज पर्यंत एकुण १२,९७९ जणांनी अॉनलाईन, प्रत्यक्ष उपोषणस्थळी आणि एकोणतीसाव्या दिवशीच्या सह्यांच्या मोहिमेस १७६ सोलापूरकरांनी सह्या करुन होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवेस सुरू होऊ पर्यंतच्या चक्री उपोषणासाठी पाठिंबा दर्शविला आणि अॉनलाईन पद्धतीने देश विदेशातुन आजपर्यंत ६५७८ जणांनी देशा विदेशातुन पाठिंबा दर्शविला.