कवी मारुती कटकधोंडच्या "डोहतळ " काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
कवी मारुती कटकधोंडच्या “डोहतळ ” काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
——————————————————-
सोलापूर :- महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा बार्शी यांच्या तर्फे देण्यात येणारा शाहीर अमर शेख राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी सोलापूरचे ज्येष्ठ कवी मारुती कटकधोंड यांच्या ” डोहतळ “काव्यसंग्रहाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली .असे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा बार्शीचे विद्यमान अध्यक्ष मा.पां.न.निपाणीकर यांनी जाहीर केले. सदर पुरस्काराचे वितरण दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रख्यात साहित्यिक, वात्रटिकाकार चित्रपटनिर्माते मा.रामदास फुटाणे यांच्या उपस्थितीत व विद्यमान आमदार मा.राजेंद्र राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी येथे संपन्न होणार आहे. हा पुरस्कार साहित्यक्षेत्रातील मानाचा समजला जातो.
या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,शाल, श्रीफळ,स्मृतिचिन्ह,व प्रमाणपत्र असे आहे.” डोहतळ” या काव्यसंग्रहाला यापूर्वी साहित्यातील सन्मानाचे चौदा पुरस्कार मिळाले आहेत. कवी मारुती कटकधोंड यांनी माणूस हा कवितेचा केंद्रबिंदू मानून माणसाच्या जगण्याचे चित्रण “डोहतळ ” या काव्यसंग्रहात शब्दबद्ध केले आहेत. उपेक्षित शोषित आणि पीडितांच्या वेदनांचे दर्शन या काव्यसंग्रहातून घडवले आहे.या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. श्रुती श्री वडगबाळकर, प्रसिद्ध उद्योगपती व मी.सा.प शाखेचे उपाध्यक्ष मा.दत्ताअण्णा सुरवसे ,म.सा.प चे कार्याध्यक्ष मा .किशोरजी चंडक, हिराचंद नेमचंद वाचनालयचे प्रमुख कार्यवाह डॉ.श्रीकांत येळेगावकर म.सा.प.जुळे सोलापूर अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी साहित्यिक राजेंद्र दास ज्येष्ठ कवी माधव पवार, राजेंद्र भोसले, डॉ स्मिता पाटील, गिरीश दूनाखे, वंदना कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे