दिपावली २०२२
महिला प्रबोधनीच्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन
महिला प्रबोधनीच्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन
महिला प्रबोधिनी या गेले 38 वर्षे दिवाळी अंक या माध्यमातून समाज प्रबोधन पर आणि साहित्य सेवा करीत आलेले अत्यंत अतिशय दर्जेदार मासिक असून आज 39 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी ,माजी प्राचार्या नसीमा पठाण, कवी देवेंद्र औटी,आतकरे सर, गुरुनाथ संगटे आदि सह कवी लेखक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .याप्रसंगी निर्मलाताई ठोकळ यांनी मासिक महिला प्रबोधिनीच्या आज पावित्र्याच्या वाटचालीचे सविस्तर विवेचन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले आभार प्रदर्शन श्री आतकरे सर यांनी केले.