इनरव्हील स्टारलेटच्या दिव्यांचा प्रकाश वंचितांच्या दारी….
- इनरव्हील स्टारलेटच्या दिव्यांचा प्रकाश वंचितांच्या
- दारी….
सोलापूर (दि.१८) इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर स्टारलेट, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा व साथी संस्था, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावली सणा निमित्त २५ गरोदर व सनदा महिला, वंचित घटकातील २५ महिला व ५० लहान मुले यांना शैक्षणिक साहित्य, फराळाचे पदार्थ व साडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्वेता पाटील व मान्यवरांच्या हस्ते दीपावलीचे दिवे लावून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फॅमिली प्लॅनिंगचे मार्गदर्शक डॉ. श्रीकांत येळेगावकर हे होते.
यावेळी व्यासपीठावर इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर स्टारलेटच्या अध्यक्षा श्वेता पाटील, सचिवा श्रद्धा घोंगडे, खजिनदार शितल मुंदडा, माजी अध्यक्षा स्मिता चाकोते, समन्वयिका यामिनी गांधी, सीमा भुतडा, फॅमिली प्लॅनिंगचे अध्यक्ष प्राचार्य के. एम. जमादार, सचिवा डॉ. अयेशा रंगरेज, खजिनदार डॉ. एन. बी. तेली, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, साथी संस्थेच्या कार्यक्रम अधिकारी रंजना अक्षंतल, समुपदेशिका सुरेखा घोडके आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. येळेगावकर म्हणाले की,
अहिरेंनी नाही रें ना आपल्या आनंदात सामावून घेतले पाहिजे. वंचितांच्या अंधाऱ्या घरात प्रकाशाचा दिवा लावून दीपावली साजरी करणे म्हणजेच खरी दिपावली साजरी करण्यासारखे आहे. इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर स्टारलेट चे हे कार्य म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासणे आहे.कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य के. एम. जमादार यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. आयेशा रंगरेज यांनी केले. सूत्रसंचालन सुगतरत्न गायकवाड यांनी केले तर आभार डॉ. एन. बी. तेली यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरेंद्र परदेशी, विजय शिंदे, आकाश गायकवाड, कल्पना गडगडे, शाहीन मेंडुक, पूजा टोणपे, अर्चना पारशेट्टी, दिनकर बनसोडे, आदींनी परिश्रम घेतले.