सोलापूर तालुका निरीक्षक अरुण फुगे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात बदली
पंढरपूर:- पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांची बदली विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे झाल्याने त्यांच्या जागी सोलापूर तालुका निरीक्षक अरुण फुगे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली असून बुधवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे अरुण फुगे यांनी यापूर्वी सोलापूर येथील विजापूर वेस पोलीस चौकी तुळजापूर वेस पोलीस चौकी व गुन्हे शाखा प्रमुख तसेच त्यानंतर सोलापूर तालुका निरीक्षक म्हणून त्यानी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे ऐन कार्तिक यात्रेच्या तोंडावर पंढरपूरच्या निरीक्षक पदी फुगे यांचे नियुक्ती झाली असून ते आपल्या कार्याचा ठसा पंढरीत कसा उमटवतात याकडेच पंढरपुर वासियांचे लक्ष असून कारण पंढरपुरात आजही राजरोसपणे होणारी चोरटी वाळू वाहतूक अवैद्य धंदे बोरोटी दादागिरी तसेच शहरातील वाहतूक शाखेला आलेला विस्कळीतपणा या गोष्टीचे त्यांचे समोर मोठे आव्हान आहे तसेच काही अधिकारी चांगले असले तरी काही अधिकारी व पोलीस हे यापूर्वी कामापेक्षा काय द्यायचं याकडेच अधिक लक्ष असल्याने सामान्यांना न्याय मिळणे अवघड होऊन बसले होते याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे काही पोलीस हे कर्तबगार असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे डीबी स्टाफ हा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कान आणि डोळे असतो तो सतत सतर्क ठेवण्याची जबाबदारी वरिष्ठ निरीक्षणावर असून ते यावर कसे लक्ष ठेवतात हे त्या काही दिवसातच पंढरपूरकरांना अनुभवायला मिळणार आहे घुगे यांना यापूर्वीचा कामाचा दांडगा अनुभव असल्याने त्याचा उपयोग पंढरपूरकरांसाठी नक्कीच होईल अशी भावना सर्व सामान्य पंढरपूर वासियांकडून व्यक्त केली जात आहे.