सोलापूर निमा

पुरूष टेलर महीलांचे माप घेऊ शकणार नाहीतच महिला आयाेगाचा आदेश

पुरूष टेलर महीलांचे माप घेऊ शकणार नाहीतच

 

महिला आयाेगाचा आदेश

 

 

नवी दिल्ली : 

पुरुष शिंपी महिलांचे मोजमाप करू शकणार नाहीत. 

 

तसेच जिम आणि योगा सेंटरमध्ये महिला प्रशिक्षकांचीच नियुक्ती करण्यात यावी. 

 

सी.सी.टी.व्ही.च्या माध्यमातून याची अंमलबजावणी होतेय की नाही ?

यावर नजर ठेवण्यात येईल, 

असा आदेश महिला आयोगाने दिला आहे. 

 

कानपूर एकता हत्याकांडानंतर उत्तर प्रदेशच्या महिला आयोगाने ही कडक कारवाई केली आहे. 

 

पार्लरमध्ये मुलींच्या मेकअप आणि ड्रेससाठी एक महिला असावी.

 

 महिलांसाठी खास कपडे विकणाऱ्या दुकानांमध्ये महिला कर्मर्‍यानाही कामावर ठेवावे. 

 

तसेच कोचिंग सेंटर्स सर्वचवर सी.सी.टी.व्ही.च्या माध्यमातून लक्ष ठेवावे असे आयोगाने म्हटले आहे. 

 

महिला आयोगाची बैठक झाली.

 

 त्या वेळी याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

 

*या मुद्द्यांची कडक अंमलबजावणी होणारच*

 

*जिम व योगा सेंटरमध्ये येणार्‍यांचे ओळखपत्र तपासणारच*, 

 

*स्कूल बसमध्ये महिला सुरक्षा कर्मचारी अनिवार्य*

 

*नाट्यकला केंद्रातही महिला शिक्षकांचीच नियुक्ती*,

 

 *महिलांसाठी विशेष कपडे विकणार्‍या दुकानांमध्येही महिला कर्मचारीच असावेत*,

 

 *सर्वच कोचिंग सेंटरमध्ये सी.सी.टी.व्ही. आणि वॉशरुमची व्यवस्था असावी*.  

 

*काय आहे कानपूर हत्या प्रकरण*

 

व्यापारी राहुल गुप्ता यांची पत्नी एकता हिचा मृतदेह २७ ऑक्टोबर २०२४ रोजी कानपूरच्या डी.एम. आवास कॅम्पसमध्ये पुरलेला आढळला होता.

 

 *४ महिन्यांपूर्वी एका जिम ट्रेनरने महिलेचे अपहरण केले होते*.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!