सोलापूर निमा

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बसपाचा आक्रोश मोर्चा

  1. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर
    बसपाचाआक्रोश मोर्चा’
    ————————————–
    सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सदैव
    संघर्ष करू :अँड.संदीप ताजने————————————–
    सोलापूर : केंद्रातील भाजप सरकारच्या ‘सुलतानी’ संकटासह बेरोजगारी,महागाईने पिचल्या गेलेल्या सर्वसामान्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी बहुजन समाज पार्टी, सोलापूर शहर तसेच जिल्ह्याच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘भव्य आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.
    देशातील तरुणांची फसवणूक करणारी अग्निपथ योजना बंद करा, सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची चौकशी करा, झोपडपट्टीधारकांना हक्काचे ५०० चौरस फूट घर द्या, वाढती महागाई, बेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, दलित-अल्पसंख्यांवरील वाढते अत्याचारावर आळा घाला, इंधन दरवाढ, घरगुती गॅसचे वाढते दर कमी करा, मुस्लिम बांधवांना उच्च न्यायालयाने दिलेल्या ५ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करा, महार वतनांच्या जमीनी बळकावणाऱ्या धनदांडग्यांपासून वतनाच्या जमीनी मुक्त करून मुळ मालकांना देण्यासंबधी शासन निर्णय करा या आणि अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
    शहरातील चार हुतात्मा पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे निघालेल्या या आंदोलनाने’ शहरवासियांचे लक्ष वेधले.
  2. बसपाचे हत्ती निवडणूक चिन्ह असलेले निळे झेंडे, जयघोषाने अवघा परिसर दणाणून गेला होता.
    महागाई, बेरोजगारीने पिचल्या गेलेल्या सर्वसामान्यांना योग्य मार्ग दाखवून त्यांचा आक्रोश सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम बसपा करीत आहे. सामान्य मतदारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राजकीय पक्षांना धडा शिवकण्याची वेळ आली आहे, असे आवाहन यानिमित्ताने अँड.ताजने यांनी केले. सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या बसपाचे हात बळकट करण्याचे आवाहन देखील यानिमित्ताने त्यांनी केले.
  3. उसाला एफआरपी प्रमाणे दर द्यावा, शेतकऱ्यांच्या मुलांचे शालेय शुल्क माफ करावे तसेच शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने मोठे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी यावेळी प्रदेश प्रभारी हुलगेश भाई चलवादी यांनी केली.
    यावेळी प्रदेश महासचिव अप्पा साहेब लोकरे, सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव विलास शेरखाने, अजित ठोकळे, संजय वाघमारे, प्रदेश सदस्य बलभीम कांबळे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष भालचंद्र कांबळे, शहर अध्यक्ष देवा भाई उघडे, उपाध्यक्ष अशोक ताकतोडे, महासचिव रवी सर्वगोड, कार्यालय सचिव करण काळे, शहर प्रभारी अमर साळवे,शहर प्रभारी सुहास सुरवसे,उपाध्यक्ष राहुल सर्वगोड, सचिव प्रवीण कांबळे, शहर सचिव मिणाज शेख, रमेश गायकवाड, मोहमद जकार्ते , मोहम्मद शफी इंद्रेकर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!