बंदुकीची गोळी लागल्यावर लगेच मृत्यू होतो का?
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पेनसिल्व्हानियामध्ये निवडणूक प्रचार रॅली सुरू असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. हल्लेखोराने त्यांच्यावर झाडलेली गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली.
या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. ही गोळी त्यांच्या डोक्यात थोडीशीही घुसली असती तर त्यांची प्रकृती गंभीर स्थितीत असती. मानवी शरीराचे असे काही भाग असे आहेत, जिथे गोळी लागल्यावर लगेच मृत्यू होतो, तर काही भाग असेल आहेत जिथे गोळी लागल्यानंतर माणूस जिवंत राहू शकतो. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, की असं का होतं? खरं तर ही स्थिती अनेक गोष्टींवर अवलंबून असते. गोळी कोणत्या प्रकारची आहे, ती शरीरावर कुठे लागली आहे आदी बाबींचा त्यात समावेश असतो.
गोळी लागल्याचा अर्थ असा होत नाही, की जखमी झालेल्या व्यक्तीचा लगेच मृत्यू होईल. आपल्या शरीराचे काही भाग अतिशय संवेदनशील असतात. तिथे गोळी लागल्यानंतर व्यक्तीचा जीव वाचणं खूप अवघड असतं; पण काही भाग असे आहेत जिथे गोळी लागल्यानंतर आणि काही तासांनंतरही उपचार मिळाले तरी जगण्याची पूर्ण संधी असते.
मुख्य म्हणजे गीळी लागल्याने मृत्यू होईल की व्यक्ती जिवंत राहील ही बाब गोळीची दिशा, शरीराच्या कोणत्या भागाला ती लागली आहे आणि उपचाराला किती वेळ लागला यासारख्या गोष्टींवर अवलंबून असते. अनेकदा असं होतं, की गोळी शरीराच्या संवेदनशील भागाला न लागताही उपचाराअभावी रक्तस्राव होऊन आणि शरीरात विष पसरून व्यक्तीचा मृत्यू होतो. शरीराच्या संवेदनशील भागाला गोळी लागल्यानंतर 40 सेकंदांतदेखील व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
प्रश्न : गोळी शरीरात गेल्यावर काय होतं?
उत्तर : गोळी शरीरात गेल्यानंतर तिच्यामुळे पेशी फाटतात. गोळी बोगद्यासारखा रस्ता बनवून शरीरात प्रवेश करते. आपल्या मार्गात येणारी प्रत्येक गोष्ट नष्ट करत जाते. रक्तवाहिन्या असोत किंवा मोठ्या नलिका, गोळी प्रत्येक गोष्टीचं वाईट प्रकारे नुकसान करत आत जाते. गोळीच्या मार्गात एखादं हाड आडवं आलं तर साहजिकच त्यालाही दुखापत होते.
प्रश्न : गोळी शरीरात गेल्यानंतर थोड्या वेळाने काय होतं?
उत्तर : गोळी आत गेल्यावर शरीरात एक पातळ छिद्र पडतं. ते मोठं होऊ लागतं आणि त्या बोगद्याच्या आसपासचे अवयव, ऊती, पेशी आणि रक्तवाहिन्या अधिक प्रभावित होऊ लागतात. रक्तस्राव वाढतो.
प्रश्न : गोळी शरीरात गेल्यावर रक्तस्त्राव होऊन विष कसं पसरतं?
उत्तर : शरीरात प्रवेश केल्यानंतर गोळी शरीराच्या प्रत्येक प्रणालीवर वाईट परिणाम करतं. गोळीमध्ये शिसं आणि कॅल्शियम सिलिकेटसारखे बरेच जड धातू असतात. कधीकधी न जळलेली गन पावडरदेखील गोळीला चिकटलेली असते. हे घटक शरीरात विष पसरवण्याचं काम करतात. जसजसा वेळ जातो तसतशी परिस्थिती गंभीर होत जाते. काही वेळा गोळी लागल्यानंतर जास्त रक्तस्रावदेखील मृत्यूला कारणीभूत ठरतो.
प्रश्न : कोणत्या अवयवांना गोळी लागल्यानंतर व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता असते?
उत्तर : हात, पाय किंवा एखाद्या बाह्य अवयवातून गोळी गेल्यास व्यक्ती जगण्याची शक्यता जास्त असते. हात-पायांमध्ये गोळी लागल्यावर उपचारांसाठी काही तासांचा विलंब झाला तरी व्यक्ती जिवंत राहण्याची शक्यता असते; पण शरीराचे काही भाग असे असतात की जिथे गोळी लागणं धोकादायक ठरतं.
प्रश्न : शरीराच्या कोणत्या भागांना गोळी लागल्यानंतर धोकादायक परिस्थिती उद्भवते?
उत्तर : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शरीरात नॉन-व्हायटल ऑर्गन आणि व्हायटल ऑर्गन असे दोन प्रकारचे अवयव असतात. महत्त्वाच्या अवयवांमध्ये हृदय, मेंदू, किडनी, लिव्हर आणि छातीभोवती असलेल्या जाड रक्तवाहिन्यांचा समावेश होतो. तिथे गोळी लागल्यानंतर काही मिनिटांत उपचार सुरू केले नाहीत, तर जीवघेणी स्थिती उद्भवू शकते. मेंदू आणि हृदयात गोळी लागल्याने लगेच मृत्यू होतो.
प्रश्न : शरीरातले कोणते अवयव अतिसंवेदनशील आहेत?
उत्तर : मेंदू आणि हृदयाला गोळी लागल्यास व्यक्ती जगण्याची शक्यता नसते. या दोन अवयवांना गोळी लागल्यास व्यक्ती तीन सेकंदं ते 40 सेकंदांत मरू शकते. माफिया डॉन अतिक अहमद आणि अशरफ यांच्या मेंदूला लक्ष्य करून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही सेकंदांतच त्यांचा मृत्यू झाला होता. जाड रक्तवाहिन्या असलेल्या ठिकाणी आणि यकृताला गोळी लागल्यास लगेच मृत्यू होतो.
प्रश्न : पूर्वीच्या बंदुकीतून आणि नवीन पिस्तुलातून गोळीबार केल्याने होणाऱ्या शारीरिक हानीमध्ये काय फरक आहे?
उत्तर : पूर्वीच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांचा वेग फार जास्त नव्हता. अचूक नेम साधला गेला नाही, तर व्यक्तीला हालचाल करून आपला जीव वाचवण्याची संधी मिळत असे; पण नवीन बंदुका बचावासाठी वेळ देत नाहीत. त्यांच्यातून सुटणाऱ्या गोळ्यांचा वेग प्रचंड आहे, त्या क्षणात लक्ष्याचा भेद करतात.
प्रश्न : गोळी कशापासून बनवली जाते?
उत्तर : गोळी पितळ या धातूपासून बनलेली असते. त्यामध्ये काही प्रमाणात शिसंदेखील मिसळलं जातं. गोळी शरीरात गेल्यावर लेड ऑक्साइड तयार होतं. हा घटक विषाची भूमिका बजावतो. गोळीबारात वापरल्या जाणाऱ्या बुलेटचे तीन भाग असतात. बंदुकीतून सुटलेल्या गोळीला कार्ट्रिज म्हणतात. त्याचे तीन भाग असतात. त्याच्या सर्वांत पुढच्या भागाला बुलेट म्हणतात. बुलेट मानवी शरीरात शिरते आणि गंभीर दुखापत करते. मधल्या भागाला केस किंवा खोखा म्हणतात. त्यामध्ये दारूगोळा भरलेला असतो. कार्ट्रिजच्या शेवटच्या भागाला प्रायमर कंपाउंड म्हणतात. हा भाग गोळीबाराच्या वेळी गनपावडरचा स्फोट घडवून आणतो. गोळीबार करताना कार्ट्रिजची केस बंदुकीतून बाहेर पडते आणि बंदुकीतून गोळी निघून जाते