सोलापूर निमा

बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचा भीषण अपघात

 

बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचा भीषण अपघात (Beed MP Bajrang Sonawane Accident) झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडकली

या अपघातामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे. रात्री उशिरा बजरंग सोनवणे यांनी मराठा आरक्षण आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते परतत असताना हा अपघात झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्यासह इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव केला. त्यानंतर ते रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झाले. जरांगे पाटील यांची भेट घेऊन परतत असताना जालना जिल्ह्यात धुळे – सोलापूर महामार्गावर रात्री उशिरा हा अपघात झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडकली. या अपघातामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे. बजरंग सोनवणे यांच्यासह इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये बजरंग सोनवणे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातामधून ते सुखरूप बचावले आहेत. जरांगे पाटील यांची भेट घेऊन परतत असताना हा अपघात झाला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!