विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या का करण्यात आली याबद्दलची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी दिली
विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या का करण्यात आली याबद्दलची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी दिली आहे.
पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना अमीतेश कुमार यांनी या हत्येसंदर्भातील तपशील दिला आहे. सतीश वाघ यांची हत्या ‘वैयक्तिक’ कारणातून झाली असल्याचे अमीतेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. सतीश वाघ त्यांना ठार मारण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनेच हे सगळं कृत्य केल्याचे तपासातून समोर आले असून खून हा खाजगी आणि वैयक्तिक कारणातूनच केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
पाचपैकी 3 आरोपींना अटक
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी 5 आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्या व्यक्तीने सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिली त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे. पुणे क्राईम ब्रँच पथकाने 10 ते 15 जणांच्या चौकशीनंतर पवन शर्मा आणि नवनाथ गुळसाळे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात घेतले. यानंतर अन्य एकालाही अटक करण्यात आला.
नेमका घटनाक्रमही समोर
अपहरण व खून या दोन्ही घटना अवघ्या तासाच्या आत घडल्याचे तपासातून समोर आलं आहे. सकाळी साडेसहा वाजता अपहरण झाले आणि ती गाडी मृतदेह टाकून सातेसात वाजता परत आल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झालं आहे. 500 ते 800 सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषणनंतर पुणे पोलिसांना सतीश वाघ यांचा मृतदेह शोधून काढला. सतीश वाघ पहाटे साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर शेवरलेट एन्जॉय या कारमधून त्यांचे अपहरण झालं.
सतीश वाघ यांचं अपहरण केल्यानंतर गाडी शिंदवणे घाटाच्या दिशेने नेण्यात आली. ही कार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी या भागातील जवळपास 500 ते 800 सीसीटीव्ही तपासले. त्यात एक गाडी शिंदवणे घाटाकडे जाताना उरूळी कांचन भागात 7 वाजून 5 मिनिटांनी दिसली. तीच गाडी पुन्हा सात वाजून 20 मिनिटांनी परत आल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. अपहरण केल्यानंतर चालत्या गाडीतच सतीश वाघ यांचा तीक्ष्ण शस्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाण करून व गळा दाबून खून करण्यात आला.