सोलापूर निमा
फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात पडणार पाऊस, कोल्हापूरसह ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट
फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात पडणार पाऊस, कोल्हापूरसह ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट
▪️ बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर पाहायला मिळू शकतो असा अंदाज असल्याने 6 डिसेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
▪️ तसेच राज्यात 3 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव परिसरात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हे चक्रीवादळ येत्या 24 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
▪️ हवामान विभागाने दक्षिण भारतात वादळी वारे, गारा आणि अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांशी भागात उद्या ढगाळ हवामान तयार होऊ शकते.