लग्नपत्रिकेतील तारखेचा घोळ मे. कोर्टात : पालिकेला नव्याने मॅरेज सर्टिफिकेट देण्याचे आदेश
लग्नपत्रिकेतील तारखेचा घोळ मे. कोर्टात :
पालिकेला नव्याने मॅरेज सर्टिफिकेट देण्याचे आदेश
लग्नाची तारीख हुकली आणि सहा महिन्याने विवाह झाला.
मॅरेज सर्टिफिकेटवर लग्नपत्रिकेवरील तारीख नोंद झाली.
या तारखेच्या घोळाने दाम्पत्याला मात्र मे.उच्चन्यायालयाची पायरी चढावी लागली.
मे. उच्चन्यायालयात
दाम्पत्याला मोठा दिलासा देत मॅरेज सर्टिफिकेटवर नव्याने तारीख नमूद करण्याची मुभा दिली.
महापालिकेला तशी दुरुस्ती करून नव्याने मॅरेज सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिले.
पुण्याचे रहिवाशी असलेल्या मात्र नोकरीनिमित्त परदेशी असलेल्या वधूने पुण्याच्या मुलाशी २३ मे २०२३ रोजी पुणे येथे विवाह निश्चित केला.
लग्न पत्रिकाही छापल्या.
मात्र त्या दिवशी वधू पुण्याला पोहचली नाही.
त्यामुळे विवाह पुढे ढकलण्यात आला. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी वधू भारतात आली आणि ६ नोव्हेंबरला बोहल्यावर चढली.
रीती रिवाजाप्रमाणे विवाह झाला.
त्यानंतर वधू तातडीने परदेशात गेली.
मॅरेज सर्टिफिकेटसाठी रीतसर पालिकेकडे अर्ज केला.
पालिकेकडून त्यांना मॅरेज सर्टिफिकेट मिळाले.
परदेशी शिक्षण घेण्यासाठी वराने व्हिसासाठी अर्ज केला.
मात्र मॅरेज सर्टिफिकेटमध्ये चुकीची तारीख असल्याने व्हिसा मिळण्यास अडचणी येऊ लागल्या.
याबाबत पालिकेशी संपर्क साधला.
मात्र पालिकेने तारीख बदलून देण्यास नकार दिला.
अखेर दांम्पत्याने मे.उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दखल केली.
या याचिकेवर न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला व न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या मे.खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी महापालिकेला दुरुस्ती करून नव्याने मॅरेज सर्टिफिकेट देण्याचे आदेश देत याचिका निकाली काढली.
*याचिकाकर्त्याने कबूल केली चूक*
मॅरेज सर्टिफिकेटवर चुकीची तारीख नमूद झाली यात पुणे महापालिकेचा दोष नाही.
लग्नपत्रिकेवरील तारखेनुसार प्रशासनाने मॅरेज सर्टिफिकेट जारी केल्याचे मान्य करून याचिकाकर्त्याने आपली चूक कबूल केली.
मे.खंडपीठाने याची दखल घेत याचिकाकार्त्याला चूक सुधारण्यासाठी संधी दिली.