पती_पत्नीचा वाद मिटून् पुन्हा संसार जुळला..
वाद टळले !, नाते जुळले !! सोलापूर कौटुंबिक न्यायालयामुळे नवविवाहित जोडप्यांचा पुन्हा नव्याने संसार सुरू
-अड. श्रीनिवास कटकुर
सोलापूर: इन्फोसिस पुणे मध्ये मॅनेजर म्हणुन नोकरीस असलेले अर्जदार सौ. प्रिया माहेरचे राहणार -अवंती नगर सोलापूर यांनी दाखल केलेल्या पतीने नांदायला घेऊन जाण्याचे केसकामी मे. न्यायालयाने समन्स काढून पतीला चांगल्या प्रकारे समुपदेशन केल्यामुळे पतीने पत्नीला नांदायला घेऊन गेले व दोघांमधील वाद टाळुन पुन्हा नाते जुळले.
यात केसची सविस्तर हकीकत अशी की
अर्जदार पत्नी सौ. प्रिया वय 25 शिक्षण – M.Tech टेली कम्युनिकेशन इंजिनिअर, नोकरी – सध्या इन्फोसिस पुणे मध्ये असि. मॅनेजर पदावर म्हणून नोकरीस असुन त्यांचे माहेर अवंती नगर , सोलापुर येथे असून त्यांचे आठ महिन्यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये सोलापूर येथे श्री सुजित , शिक्षण -M.E. सॉफ्टवेअर इंजिनिअर नोकरी – Tata Consultancy sercices TCS मध्ये मॅनेजर म्हणून कोथरूड पुणे येथे असून त्यांच्याशी प्रेम विवाह झालेला होता. व लग्नानंतर चार महिने पतीने पुणे येथे व्यवस्थित नांदविले व नंतर पतीने पत्नीचे आलेल्या पगारावरुन पैशावरुन व किरकोळ कारणावरून पत्नीस वादविवाद करुन माहेरी सोलापुर येथे पाठवले व पतीने नवविवाहित पत्नी सौ. प्रिया यांना नांदण्यास नकार देऊन माहेरी पाठवून दिले व नंतर पत्नी सौ. प्रिया यांनी स्वता: व त्पांच्या माहेरच्या लोकांनी प्रयत्न केले असता , त्पांना यश आले नाही म्हणुन शेवटी न्याय मिळणेसाठी अर्जदार पत्नी सौ. प्रिया यांनी सोलापुरातील नामवंत विधीज्ञ अँड. श्रीनीवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील मे. फॅमिली कोर्टात हिंदू मॅरेज अँक्ट 1955 कलम 9 अन्वये सामनेवाला पती श्री सुजित रा. पुणे यांच्याविरुद्ध Restitution of Conjugal Rights नांदायला घेवुन जाणेबाबतची केस सोलापूर येथील मे. फॅमिली कोर्टात पत्नीतर्फै दाखल केली व सदर केसकामी सोलापुरातील मे फॅमिली कोर्टाने सामनेवाला पती श्री सुजित यांच्याविरुद्ध समन्स जारी करून सुनावणी कामी हजर राहण्याचा आदेश दिला व पती पुण्याहुन सोलापूर येथे मे. फँमिली कोर्टात हजर झालेवर मे. फँमिली कोर्टाने उभय नवदांपत्यांच्या समुपदेशन व सल्ल्यामुळे पतीने पत्नीस चांगला प्रकारे नांदविण्याची लेखी देवुन आनंदाने नांदविण्यास घेऊन गेला. त्यामुळे नवविवाहीत जोडप्यांचा संसार पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला व याकामी सोलापूर येथील मे फॅमिली कोर्ट व विधीज्ञ अँड. श्रीनीवास कटकुर यांच्या विशेष प्रयत्नामुळे पुढील मोठा वाद टळला व पुन्हा नातेसंबंध जुळले .व उभय जोडप्यांमध्ये व व परिवारमध्ये व नातेवाईकांमध्पे आंनदाचे वातावरण पसरले.
याकामी नवविवाहीत पत्नी अर्जदार सौ. प्रिया यांच्या वतीने एस. के .लाॅ. असोसिएटसचे अँड. श्रीनीवास कटकुर, अँड. किरण कटकुर व अँड. आनंद सागर यांनी काम पाहिले