महत्वाच्या बातम्याराजकीय
बाळासाहेबांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि मनसेचा “सोलापूर बंद” मध्ये सहभाग नाही !
राजकीय द्वेषापोटीच्या सोलापूर बंदला पाठींबा नाही
बाळासाहेबांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि मनसेचा “सोलापूर बंद” मध्ये सहभाग नाही !
————————————————–राजकीय द्वेषापोटीच्या सोलापूर बंदला पाठींबा नाही
————————————————-सोलापूर : बाळासाहेबांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि मनसेचा दि. १६ डिसेंबर २०२२ रोजीच्या “सोलापूर बंद” मध्ये सहभाग नाही असे स्पष्ट करत राजकीय द्वेषापोटीच्या सोलापूर बंदला पाठींबा नाही, असा आरोप माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.या पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकारी व नेत्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर या महापुरूषांच्या वारंवार होत असलेल्या अवहेलनाबाबत त्या वक्तव्याचा निषेध करत आहोत. हे राष्ट्र पुरूष राज्याचे दैवत आहेत. त्यांच्या बद्दल आमच्या मनामध्ये नित्तांत आदर, श्रध्दा आहे. त्यांच्याकडून या महापुरूषांचा अनादर झाला, त्या लोकांचा जाहिर निषेध केला गेला. ज्यांनी अवमानकारक वक्तव्य केली. त्यांनी जाहिर दिलगीरी मागितली आहे. परंतू काही राजकीय पक्ष व काही संघटना हिंदू अस्मीतेचा विषय करून महाराष्ट्राची शांतता भंग करत आहेत, असा आरोप केला.राजकीय फायद्यासाठी महापुरूषांच्या नावाचा आधार घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेवून राज्यात अशांतता निर्माण केली जात आहे. त्यालाच अनुसरून सोलापूर शहरात महाविकास आघाडीतील काही मंडळी आणि पक्षांनी दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी बंद पुकारला आहे.वास्तविक पाहता या बंदला राजकीय रंग दिला जात आहे. त्यामुळे राजकीय द्वेषापोटी घोषित केलेल्या सोलापूर बंदमध्ये भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी होणार नाहीत,असे स्पष्ट केले.शाई फेक प्रकरणाचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र या प्रकरणात पोलीस, पत्रकार आणि काही व्यक्तींवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत..पोलीसांवर जी कारवाई झाली आहे ती योग्य नाही. ती कारवाई आणि दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.अशी आमची मागणी आहे.सध्या तब्बल दोन वर्षानंतर कोव्हीड-१९ च्या महामारीमुळे लॉकडाऊन झालेले शहर अनलॉक झाले आहे. दोन वर्षानंतर बाजारपेठा भरत आहेत. व सर्व काही सुरळीत चालू आहेत. सध्या विवाहमुहर्त आहेत. त्यामुळे बाजारपेठ बहरली आहेत. शाळा व कॉलेजमध्ये परिक्षाचा माहोल आहेत. अश्यावेळी बंद पुकारून शेतकरी, विद्यार्थी व व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.सोलापूर बंद राजकीय द्वेषापोटी बंद करून सोलापूरला वेटीस धरत काही राजकीय मंडळी शिवभक्त आणि भीम सैनिकांची माथी भडकावण्याचे काम करत सोलापूर बंद ठेवून वेटीस धरण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे सोलापूरच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक चळवळीस घातक आहे. या बंदचे परिणाम सामान्य भोगावे लागणार आहे त्यामुळे या बंदमध्ये आमचा सहभाग नाही.जनतेला शुक्रवार दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी सोलापूर बंद मध्ये कोणीही सहभाग घेवू नये असे अवाहन करत आहोत.या पत्रकार परिषदेत दिलीप कोल्हे, विनायक महिंद्रकर, श्रीकांत घाडगे, आनंत जाधव, तुकाराम मस्के, प्रशांत इंगळे , किरण पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.