होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सरसरवले राज्यसभा खासदार धनंजय महाडिक
होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सरसरवले राज्यसभा खासदार धनंजय महाडिक
_सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना दिलेल्या आश्वासनांची केली यशस्वी पुर्तता_
शेतकरी पुत्र तथा कोल्हापूरचे असूनही सोलापूरवर विषेश जिव्हाळा असलेले राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूर विकास मंचच्या वतीने गेल्या संपूर्ण महिनाभर आयोजित चक्री उपोषणाची विषेश व्यक्तीगत दखल घेऊन अभ्यासपूर्णपणे होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्याबाबत उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती यांच्या अध्यक्षतेखाली प्रश्न राज्यसभेत सोमवार दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी विचारला. सोलापूरचे लोकसभेचे खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या सोलापूरच्या विकासा विषयी असलेल्या उदासीनते बद्दल सर्व सोलापूरकरांच्या वतीने तिव्र शब्दात सोशल मिडिया सहित प्रत्यक्षात भावना व्यक्त केल्या जात आहेत. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, अशी सकारात्मक चर्चा खासदार धनंजय महाडिक यांच्या विषयी सर्व सोलापूरकर करत आहेत.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि पुढाकाराने सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव, गणेश पेनगोंडा आणि रोहित मोरे यांची बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मुंबई येथील मुख्यालयात कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या समवेत होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होई पर्यंत चक्री उपोषण तथा इतर संबंधित सर्व बाबीं विषयी सखोल माहिती जाणुन घेतली आणि सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना त्यांनी आश्वस्त केले होते की येणाऱ्या संसदीय हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करेन. सोमवार दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा यांच्या समवेत खासदार धनंजय महाडिक यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवे संदर्भात संपूर्ण माहिती जाणुन घेतली आणि आज मी सदर विषय राज्यसभेच्या पटलावर घेईन. खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूरकरांना आणि सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना दिलेल्या आश्वासनांची यशस्वी पूर्तता करून राज्यसभेत सदर विषय उपस्थित केला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि पुढाकाराने सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा आणि योगीन गुर्जर यांनी शुक्रवार दिनांक ०२ डिसेंबर २०२२ रोजी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिदित्य सिंदिया यांच्या समवेत होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूरकरांच्या तीव्र भावना उपस्थित करुन बैठक यशस्वी बैठक केली. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिदित्य सिंदिया आणि महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विनंतीवरून सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी मंगळवार दिनांक ०६ डिसेंबर २०२२ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना दिवशी उपोषण काही काळासाठी संस्थिगित करण्याचा निर्णय घेतला आणि येणाऱ्या काळात होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय हिवाळी अधिवेशनात तथा महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात जर ठोस कारवाई झाली नाही तर बुधवार दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी अत्यंत भव्य असा मुक मोर्चा काढण्यात येणार असल्याची भुमिका सोलापूर विकास मंचचे सदस्य घेतली आहे.