पैसे घेण्याची पद्धत… वकिलांकडून‘टिप’साठी पट्टेवाल्याच्या कंबरेला क्यू.आर. कोड
पैसे घेण्याची पद्धत.. वकिलांकडून‘टिप’साठी पट्टेवाल्याच्या कंबरेला क्यू.आर. कोड
नवी दिल्ली :- हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणानंतर अनेकदा बहुतांश जण वेटरला पैशाच्या रूपात टिप देतात.
मात्र, मे.अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका पट्टेवाल्याने (जमादार) वकिलांकडून टिप घेण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला.
त्याने चक्क पे.टी.एम.चा बारकोड कंबरेला लावला आणि त्याद्वारे वकिलांकडे टिप मागत होता.
त्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले असून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मे.कोर्टाच्या आवारात गणवेशात पे.टी.एम. बारकोडद्वारे वकिलांकडून टिप मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदल यांना न्यायमूर्ती अजित कुमार यांचे यासंबंधी कारवाईची शिफारस करणारे पत्र मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.