एकलव्य विद्यासंकल्प प्राथमिक शाळा यमगरवाडी , उस्मानाबाद शाळेत सर्वांकष लैंगिक शिक्षण कार्यक्रम
उस्मानाबाद दिनांक -:24 व 25 नोव्हेंबर 2022 वार -:गुरुवार व शुक्रवार
एकलव्य विद्यासंकल्प प्राथमिक शाळा मंगरूळ तालुका तुळजापूर यमगरवाडी तालुका उस्मानाबाद शाळेत 24 व 25 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वांकष लैंगिक शिक्षण पार पडले विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सन्मान होता पहिल्या दिवशी प्रिसिजन फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी श्री. माधव देशपांडे व सौ सुजाता बनसोडे यांच्या समवेत शिक्षक मीटिंग घेऊन सत्राचा शुभारंभ करण्यात आला.तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुल मध्ये किशोर आणि किशोरी मुलींची कार्यशाळा पार पाडली.एकलव्य विद्या संकुल यमगरवाडी शाळेत 24 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वंकष लैंगिक शिक्षण सत्र बैठकीत 12 शिक्षक शिक्षिका यांचा सहभागी होते तसेच हे विद्यार्थी ज्या परिस्थितीतून आले आहेत त्यांना “सर्वंकष लैंगिक शिक्षण” या माध्यमातून योग्य दिशा मिळेल असे या कार्यक्रमात सांगण्यात आले आले आहेत त्यांना सर्वंकष लैंगिक शिक्षण या माध्यमातून योग्य दिशा मिळेल असे या सत्रात आयोजन करण्यात आले सोलापूर येथील फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया व प्रेसिजन फाउंडेशन यांच्यावतीने ही कार्यशाळा घेण्यात आली यात बाल्यावस्था, किशोरावस्था आणि तारुण्य अवस्था यातून मुलं मुली जात असताना त्यांच्या मानसिक शारीरिक व भावनिक बदलांचे होणारे परिणाम तसेच किशोरींची मासिक पाळी व योग्य आहार योग्य व्यायाम वैयक्तिक स्वच्छता ,लैंगिक अत्याचार, प्रेम व आकर्षण बाल शोषण एचआयव्ही पासून स्वतःची काळजी कशी घ्यावी आदीबाबत मार्गदर्शन करण्यात आले सायबर क्राईम चे नितीन कुलकर्णी व तामलवाडी पोलीस स्टेशनचे पीएसआय रमेश घुले यांनी सायबर सिक्युरिटी यावर मार्गदर्शन केले व सर्व किशोर किशोरींची यावेळी हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली कार्यक्रमासाठी प्रसिजन फाउंडेशनचे माधव देशपांडे व वैशाली बनसोडे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे of India Program Officer श्री virendra परदेशी कम्युनिटी मोबिलायझर सुरेखा डबरे, सुजाता शेरला, मनीषा वांगीकर, रमा ताटी व लॅब टेक्निशियन सत्यभामा कांबळे आदी उपस्थित होते. किशोरी प्रकल्प विभागाच्या संगीता पाचंगे ,निर्मला होंगे तसेच सविता गोरे संतोष बनसोडे आधी यावेळी उपस्थित होते हिमोग्लोबिन तपासणी शिबिरात 231 विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली.