३१ वर्षीय महिलेवर आत्याचार करून महिलेला जिवंत जाळले
३१ वर्षीय महिलेवर आत्याचार करून महिलेला जिवंत जाळले
मणिपूरमधील जिरिबाम जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
रात्री एका ३१ वर्षीय आदिवासी महिलेवर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी सशस्त्र हल्लेखोरांनी वेगाने गोळीबार करून गावाला लुटले आणि जाळपोळ केली, असे सांगण्यात येत आहे की हल्लेखोरांनी १७ घरे जाळून टाकली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,
या घटनेत पिडितेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे.
पोलीसांनी एफ.आय.आर.मध्ये “बलात्कार आणि हत्या वांशिक आणि सामुदायिक धर्तीवर” असा उल्लेख केला आहे.
पिडितेच्या पतीने पोलीसांकडे तक्रार केली आणि हे कृत्य बेकायदेशीर घुसखोरांनी केल्याचे सांगितले,
परंतु अद्याप हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर मणिपूरच्या स्थानिक भागातील असावेत असा संशय आहे.
*गावात हल्लेखोरांची दहशत*
स्थानिक आदिवासी वकिल समितीने आय.टी.ए,सी,(I.T.A.C.) एक निवेदन जारी केले की,
हल्लेखोरांनी गावात प्रवेश करताच घरांना आग लावली आणि गोळीबार केला.
यावेळी गावातील लोक जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने पळू लागले,
मात्र एका महिलेचा जाळ्यात अडकून निर्घृण खून करण्यात आला.
ही घटना मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्षाची आणखी एक भयानक घटना बनली आहे.
*मणिपूरमधील वांशिक संघर्षामुळे परिस्थिती आणखी गंभीर*
मणिपूरमध्ये सुरू असलेला जातीय संघर्ष राज्यातील विभाजनाचे कारण बनला आहे.
मणिपूरमध्ये बहुसंख्य मेईतेई आणि आदिवासी कुकी समुदायांमध्ये सतत संघर्ष सुरू आहे,
त्यामुळे राज्यात हिंसाचाराचे वातावरण आहे.
या संघर्षात आतापर्यंत २३० लोकांचा मृत्यू झाला असून ५०,००० लोक बेघर झाले आहेत.
या घटनेने राज्यातील परिस्थिती आणखीनच चिघळली आहे.
*आदिवासी संघटनांनी केंद्राकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली*
या घटनेनंतर आदिवासी संघटनांनी मणिपूरमधील कुकी-झोमी-हमार समुदायांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
चुरचंदपूरच्या आदिवासी संघटना इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमनेही या जघन्य गुन्ह्याला जबाबदार असणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
याआधी गृहमंत्रालयाने मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात संवाद सुरू केला होता,
परंतु परिस्थिती सतत बिघडत चालली आहे.