HMPV व्हायरसमुळे महाराष्ट्रात अलर्ट मोडवर, कुठे काय खबरदारी? तुमच्या जिल्ह्यात काय तयारी?
कोरोना विषाणूनंतर आता ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही ( HMVP) या व्हायरसने चीनमध्ये हाहा:कार उडवला आहे. या विषाणूचे भारतात आतापर्यंत 6 रुग्ण आढळले आहेत. यात कर्नाटक 2, गुजरात 1, पश्चिम बंगाल 1 आणि तामिळनाडू 2 अशी रुग्णांची संख्या आहे.
तर दुसरीकडे या ह्युमन व्हायरसचे नागपूरातही 2 संशयित रुग्ण आढळले आहेत. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्र अलर्ट मोडवर आला आहे. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
नागपुरात काय तयारी?
नागपुरात सध्या HMPV चे एकंही रुग्ण नाही. संशयित आहे. संशयित दोन रुग्णांचे सॅम्पल पुण्याला पाठवले आहेत. त्यानंतर आम्ही याबद्दल बोलू. अशा स्थितीत काय करावं काय नाही? याच्या गाईडलाईन आम्ही देतो आहे. नागपूरकरांना भितीचं काहीही कारण नाही. त्या खाजगी रुग्णालयाने आमच्याशी संपर्क साधला. खोकला किंवा शिंका येत असतील, तर मास्क वापरा. तसेच हात स्वच्छ धुवा, सर्दी खोकला असल्यावर लांब रहा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घ्या, त्या रुग्णांचे रिपोर्ट दोन दिवसांत येईल, अशी माहिती एम्सचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी दिली आहे.
जे सॅम्पल घेण्यात आले, त्या सॅम्पलची जीनोम सिक्वेन्सी केली जाणार आहे. तसा हा व्हायरस जुनाच आहे. मात्र या व्हायरसमध्ये काही मुटेशन झाले की नाही हे तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी या व्हायरसची जिनोम सिक्वेन्सीनग केली जाणार आहे. यामध्ये भीतीचं कुठलंही कारण नाही. मात्र जिना सिक्वेन्सी केल्यानंतर यात म्युटेशन तर झाले नाही, हे स्पष्ट होईल. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. लहान मूल आणि 65 वर्ष वयोवृद्ध त्यांनी यामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र भीतीचे कारण नाही. हा व्हायरस HMVP आहे, असेही एम्स चे डायरेक्टर प्रशांत जोशी यांनी म्हटले.
पुणेही अलर्ट मोडवर
कोरोनाने होरपळलेलं पुणेही अलर्ट मोडवर आले आहे. हा व्हायरस नवीन असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. यासंदर्भात पुणे महापालिका सक्षम असून सर्व तयारी करण्यात आली आहे. नायडू हॉस्पिटलमध्ये 50 स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. महापालिकेअंतर्गत असणाऱ्या प्रत्येक क्षत्रिय कार्यालयाला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विषाणूचा पुण्यात अद्यापही एकही रुग्ण आढळला नसून कुणाचेही नमुने घेण्यात आले नाहीत. विमानतळावर प्रवाशांचे तपासणी करण्याचे आदेश अद्यापपर्यंत देण्यात आले नाहीत, मात्र गरज लागल्यास तपासणीचे आदेश देण्यात येतील. राज्याच्या आरोग्य विभागाकडून ज्या सूचना आलेल्या आहेत, त्यांचं पालन केले जाणार आहे, असे पुणे महापालिका आरोग्य विभाग प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी म्हटले.
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय अलर्ट मोडवर
पंढरपुरात HMVP व्हायरसबाबत पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय अलर्ट मोडवर आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पहिले एचएमपीव्ही विलगीकरण कक्ष पंढरपुरात स्थापन झाले आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात एच एम पी व्ही कक्ष स्थापन केला आहे. एच एम पी व्ही कक्षात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. एच एम पी व्ही ची लक्षणे आढळल्यास ताबडतोब दवाखान्यात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश सूडके यांनी केले आहे.
बुलढाण्यात पुरेसा औषधसाठा
HMPV च्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात hmpv ची परिस्थिती उद्भवल्यास मागील काळातील कोव्हिड रुग्णालय सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर 100 बेड बुलढाणा येथे रुग्णालय तर खामगाव येथे 50 बेडचे रुग्णालयात तयार आहे. त्यासोबत जिल्ह्यात 8 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तयार असून 1500 ऑक्सिजन सिलेंडर, २० ड्युरा सिलेंडरदेखील तयार करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात पुरेसा औषधसाठा आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच सर्वेक्षणाचे कार्य अधिक गतिमान करुन सर्दी-खोकला अर्थात आयएलआय रुग्णांचे अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
बीडमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज
देशात नव्याने HMPV हा संसर्गाने पाय रोवले आहे. याच धर्तीवर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीडमध्ये देखील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. बीडच्या शासकीय रुग्णालयात सतर्कता म्हणून आज आरोग्य अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मात्र हा संसर्ग सामान्य आहे. घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्दी, ताप, घसा दुखणे असे लक्षणे दिसत असल्यास नजीकच्या रुग्णालयात जावून तपासणी करावे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच आरोग्यदूतांना अलर्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, शिवाय मास्क चा उपयोग करावा असे आवाहन देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे